Jump to content

कुंजवन वृद्धाश्रम, भोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुंजवनवाले माधव गोडबोले या पानावरून पुनर्निर्देशित)

कुंजवन

[संपादन]

कुंजवन हा महाराष्ट्रात भोरजवळ असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे.

भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात.

गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागले. त्यावेळी वयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे गोडबोले यांनी ठरवले. इ.स. २००४ सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्‍नी स्वतः करतात.

माधव गोडबोले हे संगीताच्या खासगी शिकवण्या घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात.

या आश्रमात दूरचित्रवाणी, फ्रीज, आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
  • वृद्धाश्रमांविषयी कायद्याची अंमलबजावणी‌ किती?. महाराष्ट्र टाइम्स. १६ मार्च २०१८ रोजी पाहिले. माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचानिर्वाह व कल्याण कायदा, २००७ या कायद्यान्वये प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रमस्थापन करण्यात आले का, वृद्धाश्रमांबद्दल आणि कायद्यातील विविध कल्याणकारी तरतुदींविषयी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने प्रसिद्धी केली का, इत्यादी माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. no-break space character in |अवतरण= at position 96 (सहाय्य)