"जिग्नेश मेवानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जिग्नेश मेवानी''' हे गुजराती सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. द...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:१९, १८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

जिग्नेश मेवानी हे गुजराती सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. दलित हक्क कार्यकर्ते असलेल्या मेवाणी यांचा २०१७ मध्ये गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून १८१५० मतांनी विजय झाला आहे.

उना गावात गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केल्यानंतर मेवानीच्या नेतृत्वाखाली दलित अस्मिता यात्रा काढण्यात आली होती. त्यात २० हजार महिलांनी सहभाग घेतला होता. या मोर्चातूनच मेवानींचा राजकीय उदय झाला होता.