"पन्नालाल सुराणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पन्नालाल सुराणा (जन्म - ९ जुलै १९३३) हे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील प... |
(काही फरक नाही)
|
२२:४९, २७ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
पन्नालाल सुराणा (जन्म - ९ जुलै १९३३) हे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते व चळवळे आहेत.
पन्नालाल सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. सध्या (२००९ साली) ते सोशालिस्ट फ्रन्टचे राष्ट्रीय सचिव व साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.
पन्नालाल सुराणा यांनी लिहिलेली पुस्तके
पुरस्कार
- मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२००९)