पन्नालाल सुराणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पन्नालाल सुराणा (जन्म - ९ जुलै १९३३) हे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते व चळवळे आहेत.

पन्नालाल सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. सध्या (२००९ साली) ते सोशालिस्ट फ्रन्टचे राष्ट्रीय सचिव व साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

पन्नालाल सुराणा यांनी लिहिलेली ४० पैकी काही पुस्तके[संपादन]

  • कथा वीणाची (पत्नी वीणा पुरंदरे-सुराणा यांचे चरित्र)
  • कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता
  • गांधीजींची ओळख
  • ग्यानबाचं अर्थकारण
  • जागतिकीकरणाने केलेली फसवणूक (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक अमित भादुरी)
  • बुलंद आवाज बाईचा (प्रमिला दंडवते यांचे चरित्र)
  • महात्मा गांधी आणि दलित समस्या
  • शहा आयोग - शोध आणि बोध
  • शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा (बालसाहित्य, सहलेखक जीवराज सावंत)

पन्नालाल सुराणा यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

  • पन्नालाल सुराणा : एक समर्पित जीवन (लेखिका - डॉ. दीपा दिनेश सावळे)

पुरस्कार[संपादन]