Jump to content

"नंदू भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
तारीख
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नंदू भेंडे''' ([[इ.स. १९५५|१९५५]] - [[११ एप्रिल]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[रॉक संगीत| रॉक संगीतातील]] गायक होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार आशा भेंडे व रंगकर्मी [[आत्माराम भेंडे]] त्यांचे ते पुत्र होज. जिझस क्इईस्ट सुपरस्टार या [[अदी मर्झबान]] निर्मित नाटकामुळे व ‘तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे ते ख्यातनाम झाले.
'''नंदू भेंडे''' ([[इ.स. १९५५|१९५५]] - [[११ एप्रिल]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[रॉक संगीत| रॉक संगीतातील]] गायक होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार आशा भेंडे व रंगकर्मी [[आत्माराम भेंडे]] त्यांचे ते पुत्र होत. त्याचे मामा कवी निस्सीम इझिकेल. 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या [[अदी मर्झबान]] निर्मित नाटकातील 'ज्युडास'च्या भूमिकामुळे व ‘तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे ते ख्यातनाम झाले.

नंदू भेंडे (मूळ नाव सदानंद) हे मराठीतील पहिले रॉकस्टार होते. सन १९७०च्या दशकात मराठी संगीतप्रेमींना नाट्यसंगीताने, भावसंगीताने वेड लावले होते. त्या काळात नंदू भेडे यांनी रॉक म्युझिक मराठीत आणले. जोश, जल्लोषाने भरलेले हे संगीत तरुणांना आवडले. 'तीन पैशाचा तमाशा' या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.

==सांगीतिक कारकीर्द==
नंदू भेंडे यांनी व्हेलवेट फॉग, सेव्हेज एन्काउंटर आणि ऑटोमिक फॉरेस्ट या बँडमध्ये गाणी गायली होती. त्याचप्रमाणे 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या नाटकांमधील त्यांची भूमिकाही जबरदस्त गाजली होती. १९८० मध्ये नंदू भेंडेंनी 'डिस्को डान्सर' या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आणि ते 'गोल्ड डिस्क'चे मानकरी ठरले. [[आर.डी. बर्मन]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]], [[बप्पी लहरी]] यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. नंदू भेंडे यांनी सोनी टीव्हीवरची 'चमत्कार', दूरदर्शनवरील 'चंद्रकांता', झी टीव्हीवरची 'जिना इसी का नाम है', 'दायरे' यासारख्या काही मालिकांनाही संगीत दिले होते.

नंदू भेंडे यांच्या 'गेलो होतो रानात’ सारख्या मराठी गाण्यांना त्या वेळच्या दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली होती..

==म्युझिक कंपनी==
१९८७ साली नंदू भेंडे यांनी स्वतःची ‘म्युझिक सॉफ्टवेअर’ नावाची संगीत-निर्मिती कंपनी आणि १९९२च्या नोव्हेंबरमध्ये ‘स्पेक्ट्रम मल्टिमीडिया’ या नावाची कंपनी त्यांनी स्थापली. यापैकी स्पेक्ट्रमने एफएम रेडिओसाठी मराठी आणि कोंकणी भाषेत कार्यक्रम-निर्मिती केली. हा गायनेतर व्याप इतका वाढला की, १९९८च्या मे महिन्यात ‘इन सिंक स्टुडिओ’ हा ३२- ट्रॅक रेकॉर्डिगची सोय असलेला स्टुडिओच त्यांनी स्थापला. त्याचीही अल्पावधीत भरभराट होऊन वर्षभराच्या आत या स्टुडिओत ६४-ट्रॅक रेकॉर्डिगची सोय झाली.

नंदू भेंडे यांना केवळ सुरांचे नव्हे, सुरांमागच्या तंत्राचेही आकर्षण होते. संगणकीय संगीताच्या जमान्याशी त्यांनी सहज जुळवून घेतले, ते याचमुळे. इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे क्षेत्रात त्यांनी हातपाय पसरून पाहिले व तेथेच राहणे त्यांना कठीण नव्हते, परंतु तरुणांना आवाज आणि संगीत-तंत्र यांचे शिक्षण देण्यात ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत रमले होते.

{{DEFAULTSORT:भेंडे, नंदू}}
{{DEFAULTSORT:भेंडे, नंदू}}

१२:३५, १७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

नंदू भेंडे (१९५५ - ११ एप्रिल, २०१४) हे रॉक संगीतातील गायक होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार आशा भेंडे व रंगकर्मी आत्माराम भेंडे त्यांचे ते पुत्र होत. त्याचे मामा कवी निस्सीम इझिकेल. 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या अदी मर्झबान निर्मित नाटकातील 'ज्युडास'च्या भूमिकामुळे व ‘तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे ते ख्यातनाम झाले.

नंदू भेंडे (मूळ नाव सदानंद) हे मराठीतील पहिले रॉकस्टार होते. सन १९७०च्या दशकात मराठी संगीतप्रेमींना नाट्यसंगीताने, भावसंगीताने वेड लावले होते. त्या काळात नंदू भेडे यांनी रॉक म्युझिक मराठीत आणले. जोश, जल्लोषाने भरलेले हे संगीत तरुणांना आवडले. 'तीन पैशाचा तमाशा' या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.

सांगीतिक कारकीर्द

नंदू भेंडे यांनी व्हेलवेट फॉग, सेव्हेज एन्काउंटर आणि ऑटोमिक फॉरेस्ट या बँडमध्ये गाणी गायली होती. त्याचप्रमाणे 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या नाटकांमधील त्यांची भूमिकाही जबरदस्त गाजली होती. १९८० मध्ये नंदू भेंडेंनी 'डिस्को डान्सर' या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आणि ते 'गोल्ड डिस्क'चे मानकरी ठरले. आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. नंदू भेंडे यांनी सोनी टीव्हीवरची 'चमत्कार', दूरदर्शनवरील 'चंद्रकांता', झी टीव्हीवरची 'जिना इसी का नाम है', 'दायरे' यासारख्या काही मालिकांनाही संगीत दिले होते.

नंदू भेंडे यांच्या 'गेलो होतो रानात’ सारख्या मराठी गाण्यांना त्या वेळच्या दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली होती..

म्युझिक कंपनी