Jump to content

"जीवक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जीवक कौमारभच्च हॆ प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य...
(काही फरक नाही)

२१:४०, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

जीवक कौमारभच्च हॆ प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. अनेक बौद्ध ग्रंथांध्ये त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल प्रशंसा केलेली आढळते. ते बालरोगतज्ज्ञ होते; गौतम बुद्धांचे खासगी वैद्य होते.

जीवक कौमारभच्चांचा जन्म बिंबिसार राजाच्या कारकिर्दीत मगध देशाच्या राजधानीत (सध्याची राजगीर) झाला. त्यांची आई एक गणिका होती. लोकलाजेस्तव आईने त्यांनी एका कचर्‍याच्या ढिगावर फेकून दिले. बिंबिसारचा मुलगा अभय याला हे समजले. त्यांनी जीवकाला घरी आणून त्याच्या पालन पोषणाची व्यवस्था केली; उच्च शिक्षणासाठी त्याला तक्षशिला विश्वविद्यालयात पाठवले. तेथे अत्रेयांच्या हाताखाली सात वर्षॆ अभ्यास करून जीवक आयुर्वेदाचार्य बनले.

जीवकाबद्दलची पुस्तके

  • जीवक एक बाल अश्विनीकुमार (कादंबरी, मूळ हिंदी, लेखिका मालविका कपूर; मराठी अनुवाद - डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी) (विश्वकर्मा प्रकाशन)