"कूर्म जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार (कू... |
(काही फरक नाही)
|
१२:२०, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
कूर्म जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार (कूर्मावतार) घेतला त्या दिवसाची आठवण करून देणारा दिवस.
देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले. देवांनी आणि दैत्यांनी आपाआपसातले मतभेद विसरून मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला. परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप-कूर्मावतार-धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते.