Jump to content

"बालाजी तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाद्वारे पु्त्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी २०१५ साली नोव्हेंबरमध्ये अहमदनगर जिल्हा सर्जनकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते. हा विषय आयुर्वेदाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तज्‍ज्ञांचे मत घेण्यासाठी पाठवण्यात आला. तज्ज्ञांनी बालाजी तांबेंवर पुत्रप्राप्‍तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. बालाजी तांबे यांचा हेतू पुत्रप्राप्‍तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा आहे हे पुस्तकातून सिद्ध झाले असल्याचे विद्यापीठाच्या समितीने म्हटले आहे. यामुळे पुरुषप्रधानतेचा विचार लोकांमध्ये रुजण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. या पुस्तकाचा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबतच्या जनजागृती मोहिमेवर परिणाम झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. एकूणच या पुस्तकामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=बालाजी तांबेंवर सरकारने दाखल केला गुन्हा|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/government-registered-a-case-against-balaji-tambe/articleshow/52757656.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]]|दिनांक = १५ जून २०१६}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Balaji Tambe: बालाजी तांबेंवर सरकारकडून गुन्हा दाखल|दुवा=http://www.loksatta.com/mumbai-news/government-filed-crime-against-balaji-tambe-1251473/|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक = १५ जून २०१६}}</ref>

पुत्रप्राप्तीचा प्रचार करुन गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बालाजी तांबे, पुस्तकप्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने संगमनेरच्या कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पुत्रप्राप्तीचा प्रचार करुन गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बालाजी तांबे, पुस्तकप्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने संगमनेरच्या कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

असे असले तरी कोर्टाने बालाजी तांबे यांनी फक्त जुन्या ग्रंथांतील माहिती दिली असल्याचे कारण सांगून कोर्टाने त्यांना या खटल्यातून निर्दोष ठरवले आहे.

==बालाजी तांबे यांच्या 'गर्भसंस्कार'वर दैनिक लोकसत्तातील १६-६-२०१६चे संपादकीय - उलटा चष्मा==
'''‘तांबे’ आणि ‘पितळ’!..'''

मंत्रतंत्र, जादूटोण्यासारख्या भंपक गोष्टी जगाच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेशा नाहीत, हे समाजाला समजावण्यासाठी विज्ञानयुगाची आणखी किती वष्रे वाया जाणार आहेत, हे समजेनासेच झाले आहे. विज्ञानाला अशक्य असे काहीही नाही असा डांगोरा एकीकडे पिटला जात असतानाही, पुराणकथांच्या कपोलकल्पित गोष्टींचे गारूड घालून समाजाला नादी लावणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी राज्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला, पण त्यालाही बगल देणाऱ्यांची दुकानदारी मात्र अव्याहतपणे सुरूच आहे. वशीकरण, संतती समस्या, पुत्रलाभ करून देणाऱ्या बंगाली बाबाच्या रेल्वेच्या डब्याडब्यांत दिसणाऱ्या जाहिराती असोत किंवा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर व्यवस्थित आध्यात्मिकतेचा आव आणत हीच दुकानदारी करणारे वैदू, बाबा-बुवा असोत, साऱ्यांची जातकुळी समाजाला भुरळ घालून लुबाडणाऱ्या भोंदूगिरीचीच असते. मुलगा-मुलगी भेद नको असा संदेश देत समाजाला पुरोगामित्वाची पाऊलवाट आखून देण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर करावयाचा, त्याच माध्यमांनी आपले अवघे ‘साम्राज्य’ अशा भोंदूंच्या चरणी अर्पण केल्यानंतर विज्ञानाच्या वाटा कशा टिकणार, हा साधा प्रश्नदेखील कुणाला पडू नये, ही आश्चर्याची बाब आहे. सुशिक्षित समाजालाही मूर्ख बनविणाऱ्या क्लृप्त्या वापरून त्याचा वारेमाप डांगोरा पिटत स्वत:च स्वत:वर साधुत्वाची झूल पांघरून घेणाऱ्या काही भोंदूंचे पितळ उघडे पडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे वरवर जे शुद्ध तांबे वाटते, ते तर कळकटलेले पितळ आहे, याचे पुरेपूर पुरावे आता समोर येऊ लागतील. एका अभिमन्यूने चक्रव्यूहभेदाचा संस्कार गर्भावस्थेत असतानाच श्रीकृष्णाकडून घेतल्याची एक पुराणकथा सांगितली जाते. आजच्या धकाधकीच्या जगण्यात सुखी संसाराचे संस्कार विकत देता येतात याची काही धंदेवाईक दुकानदारांना खात्री झाल्याने, ही कथा नव्या रूपाने मांडून गर्भसंस्काराचे वर्ग सुरू करणाऱ्या बुवांनी स्वत:वर चढविलेली तकाकी जरी तांब्याइतकी तुकतुकीत दिसत असली, तरी मुळात त्या मुलाम्याखाली धंदेवाईकपणाचे पितळ आहे, हे स्पष्ट होऊ लागले आहे. असे धंदे करून जे भोंदू स्वत:च ‘गुरुत्व’मध्यस्थानी जाऊन बसले, त्यांना आता तेथून पायउतार व्हावे लागणार आहे. शेजारच्या चौरंगावरील श्रीकृष्णाची मूर्ती जणू आपल्या तोंडून उपदेशामृत वदविते असा कृत्रिम देखावा निर्माण करून अधिकारीपदाचा आभास पसरविणारे उच्च पांढरपेशांचे भोंदू गुरुवर्य काय किंवा एखाद्या पडक्या झोपडीत दैवी संचाराची नाटके करणारे भंपक बंगाली बाबा काय, या साऱ्यांना एकाच तराजूत मोजण्याची गरज असताना, काही बाबांच दैव मात्र उच्चस्थानावरील अंधश्रद्ध लोकांच्या आशीर्वादाने फळफळते, तेव्हा विज्ञानालाही लाजेने मान खाली घालावीशी वाटत असावी. अशा लोकांच्या सावलीतच ‘बाल’पण सरून प्रौढत्वाची शारीरिक उंची गाठलेल्यांच्या बौद्धिक उंचीचे मोजमाप आता सुरू झाले आहे. ते पूर्ण होईल, तेव्हा तांबे आणि पितळ यांतील भेदही स्पष्ट होईल..

==पुरस्कार==
==पुरस्कार==

१८:२१, २५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बालाजी तांबे (२८ जून, इ.स. १९४० - ) हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत.

बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री आहे. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडीलांनी आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली.

आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे.

इ.स. २००३सालापासून बालाजी तांबे यांनी संपादित केलेली फॅमिली डॉक्टर नावाची पुरवणी पुण्याच्या दैनिक सकाळबरोबर दर शुक्रवारी प्रकाशित होते. साम नावाच्या मराठी दूरचित्रवाहिनीवर त्यांचे आठवडाभर रोज भगवद्‌गीता या विषयावर प्रवचन होते. ’गीता योग’ या नावाने ही प्रवचने २०११सालापासून सुरू आहेत.

पुस्तके

  • आत्मरामायण (गुजराती भाषेत)
  • आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
  • आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
  • आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
  • चक्र सुदर्शन (मराठी)
  • मंत्र आरोग्याचा
  • मंत्र जीवनाचा
  • वातव्याधी
  • श्री गीता योग - शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
  • श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
  • संतुलन क्रियायोग (मराठी)
  • स्त्रीआरोग्य
  • स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)
  • Living Meditation through Om Swarupa (४ भाग)
  • Santulan Kriya Yog (SKY)
  • Shri Gita Tarot: Shri Krishna Answers Your Question (Set of 61 Divine Cards, इंग्रजी-मराठी)
  • The Untold Secrets Of Life

बालाजी तांबे यांच्यावर गुन्हा दाखल

'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाद्वारे पु्त्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी २०१५ साली नोव्हेंबरमध्ये अहमदनगर जिल्हा सर्जनकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते. हा विषय आयुर्वेदाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तज्‍ज्ञांचे मत घेण्यासाठी पाठवण्यात आला. तज्ज्ञांनी बालाजी तांबेंवर पुत्रप्राप्‍तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. बालाजी तांबे यांचा हेतू पुत्रप्राप्‍तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा आहे हे पुस्तकातून सिद्ध झाले असल्याचे विद्यापीठाच्या समितीने म्हटले आहे. यामुळे पुरुषप्रधानतेचा विचार लोकांमध्ये रुजण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. या पुस्तकाचा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबतच्या जनजागृती मोहिमेवर परिणाम झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. एकूणच या पुस्तकामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.[][]

पुत्रप्राप्तीचा प्रचार करुन गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बालाजी तांबे, पुस्तकप्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने संगमनेरच्या कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

असे असले तरी कोर्टाने बालाजी तांबे यांनी फक्त जुन्या ग्रंथांतील माहिती दिली असल्याचे कारण सांगून कोर्टाने त्यांना या खटल्यातून निर्दोष ठरवले आहे.

बालाजी तांबे यांच्या 'गर्भसंस्कार'वर दैनिक लोकसत्तातील १६-६-२०१६चे संपादकीय - उलटा चष्मा

‘तांबे’ आणि ‘पितळ’!..

मंत्रतंत्र, जादूटोण्यासारख्या भंपक गोष्टी जगाच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेशा नाहीत, हे समाजाला समजावण्यासाठी विज्ञानयुगाची आणखी किती वष्रे वाया जाणार आहेत, हे समजेनासेच झाले आहे. विज्ञानाला अशक्य असे काहीही नाही असा डांगोरा एकीकडे पिटला जात असतानाही, पुराणकथांच्या कपोलकल्पित गोष्टींचे गारूड घालून समाजाला नादी लावणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी राज्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला, पण त्यालाही बगल देणाऱ्यांची दुकानदारी मात्र अव्याहतपणे सुरूच आहे. वशीकरण, संतती समस्या, पुत्रलाभ करून देणाऱ्या बंगाली बाबाच्या रेल्वेच्या डब्याडब्यांत दिसणाऱ्या जाहिराती असोत किंवा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर व्यवस्थित आध्यात्मिकतेचा आव आणत हीच दुकानदारी करणारे वैदू, बाबा-बुवा असोत, साऱ्यांची जातकुळी समाजाला भुरळ घालून लुबाडणाऱ्या भोंदूगिरीचीच असते. मुलगा-मुलगी भेद नको असा संदेश देत समाजाला पुरोगामित्वाची पाऊलवाट आखून देण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर करावयाचा, त्याच माध्यमांनी आपले अवघे ‘साम्राज्य’ अशा भोंदूंच्या चरणी अर्पण केल्यानंतर विज्ञानाच्या वाटा कशा टिकणार, हा साधा प्रश्नदेखील कुणाला पडू नये, ही आश्चर्याची बाब आहे. सुशिक्षित समाजालाही मूर्ख बनविणाऱ्या क्लृप्त्या वापरून त्याचा वारेमाप डांगोरा पिटत स्वत:च स्वत:वर साधुत्वाची झूल पांघरून घेणाऱ्या काही भोंदूंचे पितळ उघडे पडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे वरवर जे शुद्ध तांबे वाटते, ते तर कळकटलेले पितळ आहे, याचे पुरेपूर पुरावे आता समोर येऊ लागतील. एका अभिमन्यूने चक्रव्यूहभेदाचा संस्कार गर्भावस्थेत असतानाच श्रीकृष्णाकडून घेतल्याची एक पुराणकथा सांगितली जाते. आजच्या धकाधकीच्या जगण्यात सुखी संसाराचे संस्कार विकत देता येतात याची काही धंदेवाईक दुकानदारांना खात्री झाल्याने, ही कथा नव्या रूपाने मांडून गर्भसंस्काराचे वर्ग सुरू करणाऱ्या बुवांनी स्वत:वर चढविलेली तकाकी जरी तांब्याइतकी तुकतुकीत दिसत असली, तरी मुळात त्या मुलाम्याखाली धंदेवाईकपणाचे पितळ आहे, हे स्पष्ट होऊ लागले आहे. असे धंदे करून जे भोंदू स्वत:च ‘गुरुत्व’मध्यस्थानी जाऊन बसले, त्यांना आता तेथून पायउतार व्हावे लागणार आहे. शेजारच्या चौरंगावरील श्रीकृष्णाची मूर्ती जणू आपल्या तोंडून उपदेशामृत वदविते असा कृत्रिम देखावा निर्माण करून अधिकारीपदाचा आभास पसरविणारे उच्च पांढरपेशांचे भोंदू गुरुवर्य काय किंवा एखाद्या पडक्या झोपडीत दैवी संचाराची नाटके करणारे भंपक बंगाली बाबा काय, या साऱ्यांना एकाच तराजूत मोजण्याची गरज असताना, काही बाबांच दैव मात्र उच्चस्थानावरील अंधश्रद्ध लोकांच्या आशीर्वादाने फळफळते, तेव्हा विज्ञानालाही लाजेने मान खाली घालावीशी वाटत असावी. अशा लोकांच्या सावलीतच ‘बाल’पण सरून प्रौढत्वाची शारीरिक उंची गाठलेल्यांच्या बौद्धिक उंचीचे मोजमाप आता सुरू झाले आहे. ते पूर्ण होईल, तेव्हा तांबे आणि पितळ यांतील भेदही स्पष्ट होईल..

पुरस्कार

  • आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड (२०१४).
  • डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी (जानेवारी २०१७)

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/government-registered-a-case-against-balaji-tambe/articleshow/52757656.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.loksatta.com/mumbai-news/government-filed-crime-against-balaji-tambe-1251473/. Missing or empty |title= (सहाय्य)