"नंदकिशोर कपोते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. नंदकिसोर कपोते हे एक कथ्थक नर्तक आहेत. पिंपरी चिंचवडमधील यमु... |
(काही फरक नाही)
|
२३:१८, ११ जुलै २०१७ ची आवृत्ती
डॉ. नंदकिसोर कपोते हे एक कथ्थक नर्तक आहेत. पिंपरी चिंचवडमधील यमुनानगर (निगडी) येथे त्यांची ‘नंदकिशोर कल्चरल सोसायटी’ नावाची गायन, नृत्य, वाद्यवादन, हिंदुस्तानी शास्त्रीय कंठ संगीत, कर्नाटक कंठ संगीत आदी कला शिकवणारी संस्था आहे. नंदकिशोर कपोते यांनी दिल्लीत पं. बिरजू महाराज यांच्या घरी दहा वर्षे राहून नृत्यशिक्षण घेतले. नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यात पीएच.डी मिळवली आहे. पं. कपोते हे दूरदर्शनचे 'ए' ग्रेड प्राप्त कथ्थक नर्तक आहेत. त्यांचे अमेरिका कॅनडा, कुवेत, जपान, रशिया, हॉलंड आदी देशांमध्ये तसेच मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनवर कथक नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.
नंदकिशोर कपोते हे .स. १९९१पासून ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ नावाच्या [[नृत्यनाटिका [बॅले)|नृत्यनाटिकेचे]] प्रयोग करत आले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात. २५ वर्षांत या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत.
डॉ. नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची कथक नृत्यातील संशोधनासाठी सीनियर फेलोशिप जाहीर झाली आहे (२०१७). संपूर्ण भारतात कथक नृत्यासाठी ही सीनियर फेलोशीप मिळविणारे डॉ. नंदकिशोर कपोते हे पहिले नर्तक आहे. या फेलोशिपच्या माध्यमांतून डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे प्राचीन ग्रंथ ‘अभिनयदर्पण’ आणि नाट्यशास्त्र यांतील हस्तमुद्रा आणि कथकनृत्य यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करतील.
नंदकिशोर कपोते यांना मिळालेले पुरस्कार
- ब्रह्मानंद कला मंडळाचा ब्रह्मनाद कलागौरव पुरस्कार (एप्रिल २०१४)
- पुणे महानगरपालिकेतर्फे `बालगंधर्व पुरस्कार (जून २०१४)