"विनया केत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: विनया केत या प्रसिद्ध कायझेन तज्ज्ञ विश्वास फडतरे यांच्या कन्... |
(काही फरक नाही)
|
१६:१९, २७ मे २०१७ ची आवृत्ती
विनया केत या प्रसिद्ध कायझेन तज्ज्ञ विश्वास फडतरे यांच्या कन्या आहेत.
भारताची दोन टोके असलेल्या लेह आणि कन्याकुमारी या गावांमधले अंतर जवळपास चार हजार किलोमीटर आहे. मात्र, पुण्यातल्या विनया केत यांनी चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केले. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. लेह मधील नागमोडी वळणे, खडतर रस्ते आणि गोठवणारे वातावरण यांना तोंड देत विनया केत यांनी हा प्रवास केला. हा आव्हानात्मक प्रवास करताना विनया यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनोळखी भाग, रात्रीचा प्रवास करताना मनात असलेली भीती या सर्वावर मात करत विनया यांनी हे अंतर पार केले.
विनया यांनी २५ जून २०१६ला हा प्रवास सुरु केला, आणि पहिल्याच दिवशी त्यांनी एक हजार २७५ किलोमीटर अंतर पार केले आणि शेवटी २९ जून २०१६ला चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत त्या कन्याकुमारीला पोहोचल्या. विनया केत या आधीची फक्त सात आठ वर्ष चार चाकी गाडी चालवत होत्या.