विश्वास फडतरे
विश्वास फडतरे (इ.स. १९५४ - इ.स. २०१७) हे मराठी लेखक आणि कायझेन तज्ज्ञ होते. त्यांनी कायझेन हे मराठी पुस्तक लिहिले.
फडतरे पुण्यातील राजा बहादूर कंपनीत व नंतर मिल्टन कंपनीतही काही काळ व्यवस्थापक होते. नंतर त्यांनी वेडझेन इन्स्टिट्यूटमध्ये आणि भारतातील व्यवसाय क्षेत्रात कायझेन तज्ज्ञ नात्याने काम केले.
कायझेन
[संपादन]कायझेन हा जपानी शब्द आहे. त्या अर्थ सततची सुधारणा, चांगल्यासाठी बदल आणि हे सारे करायचे ते आनंदासाठी असा आहे. फडतरे यांनी बारा प्रकरणांमध्ये हे लिहिले आहे. संघभावना, सकारात्मक दृष्टिकोन याबरोबरच आत्मविश्वासाने कसे काम करायचे हे यातील काही मुद्दे आहेत. हे पुस्तक संक्षिप्त आवृत्तीमध्येसुद्धा उपलब्ध आहे.
कौटुंबिक
[संपादन]फडतरे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिताराजे पवार यांचे बंधू होत; लेह ते कन्याकुमारी हा सलग प्रवास करून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' करणाऱ्या विनया केत या त्यांच्या कन्या होत.