विनया केत
Appearance
विनया केत या लेह ते कन्याकुमारी हा प्रवास सलग करणाऱ्या मराठी महिला आहेत.
भारताची दोन टोके असलेल्या लेह आणि कन्याकुमारी या गावांमधले अंतर अंदाजे चार हजार किलोमीटरचे अंतर त्यांनी चार चाकी वाहनातून ९८ तासांत पूर्ण केले. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. नागमोडी वळणे, खडतर रस्ते आणि गोठवणारे वातावरण यांसह अनेक अडचणींतून केत यांनी हा प्रवास केला.
केत यांनी २५ जून २०१६ला हा प्रवास सुरू केला. पहिल्या दिवशी त्यांनी एक हजार २७५ किलोमीटर अंतर पार केले आणि २९ जून २०१६ला त्या कन्याकुमारीला पोहोचल्या. याआधी त्यांना आठेक वर्षे चारचाकी गाडी चालविण्याचा अनुभव होता.
या कायझेन तज्ज्ञ विश्वास फडतरे यांच्या कन्या होत.
यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पी.एचडी.)चे संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.