"थिएटर फ्लेमिंगो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ‘थिएटर फ्लेमिंगो’ हा गावागावात मराठी नाटक नेण्याच्या उद्देशान... |
(काही फरक नाही)
|
१२:४४, २५ मे २०१७ ची आवृत्ती
‘थिएटर फ्लेमिंगो’ हा गावागावात मराठी नाटक नेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला पुण्याच्या तरुणांचा एक उपक्रम आहे’
महाराष्ट्र नाटकवेडा असतानाही मराठी नाटक मुंबई - पुणे या वर्तुळाबाहेर फारसे पोचत नाही. ग्रामीण भागात तर नाट्यप्रयोगच होत नाहीत, अशी खंत अनेकजण व्यक्त करतात. ती दूर करण्यासाठी आणि गावागावांत नाटक घेऊन जाण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ‘थिएटर फ्लेमिंगो’ असे त्यांनी या उपक्रमाला नाव दिले असून, त्यामुळे नाटक महाराष्ट्रात सर्वदूर पोचणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाटकाचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या काही मुलांनी थिएटर फ्लेमिंगो ही नाट्यप्रयोग संस्था स्थापन केली आहे. ‘‘थिएटर फ्लेमिंगो’च्या निमित्ताने नऊ विद्यार्थी एकत्र आलो असून नाटकाशी संबंधित सर्व जबाबदारी ते स्वतःच पेलतात.. ते काही ठिकाणी तीन तासांचे नाटक, तर काही ठिकाणी सोलो प्ले सादर करतात. सध्या ही यात्रा पुण्यात असली तरी ती पुण्यानंतर सिंधुदुर्ग, कणकवली, इचलकरंजी, कोल्हापूर, गोवा अशा निरनिराळ्या भागांत जाईल.
यानिमित्ताने नाटक ग्रामीण भागापर्यंत पोचणार आहे.