Jump to content

"यशवंत एकनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंत एकनाथ पाटील (जन्म : बोरिवडे, ४ मार्च १९३०; मृत्यू : कोडोली, १७...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
आमदारपदाच्या कालावधीत यशवंत एकनाथ यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांसाठी अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. [[पन्हाळा]], [[गगनबावडा]] व [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील [[वैभववाडी]] हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मूलभूत गरजांसाठीही आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील ह्यांना सातत्याने कार्यरत रहावे लागले.

विधानसभेत स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकार्‍यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत होती.. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले.

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत पंचवीस वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाले. आठ छोटी-मोठी धरणे बांधण्याबरोबर कधीही वीज न पाहिलेल्या वाड्या-वस्त्यांवर वीज पोहचवत त्यांनी रस्त्यांसह अन्य विकासकामांत आघाडी घेतली. ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम करणार्‍या यशवंत एकनाथ यांनी पदाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती की, स्वार्थी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कुणाकडे कधी भीक मागितली नाही. त्यामुळेच क्षमता असूनही पंचवीस वर्षांत एकदाही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. व्यक्तिमत्त्वात कमालीची जरब, मात्र मनाने दिलदार असणार्‍या या नेत्याला महाराष्ट्र ‘वारणेचा वाघ’ म्हणून ओळखत होता. वसंतदादांबद्दल अपशब्द वापरणार्‍या आमदाराला जागेवरच उचलून फेकणार्‍या पाटील यांची चांगल्या अर्थाने प्रशासनातही ‘दादा’गिरी होती. त्यामुळेच जनेतची कामे तात्काळ व्हायची. सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा नेता शेवटच्या क्षणापर्यंत जनहिताच्या कामात व्यग्र राहिला. आमदारकी गेल्यानंतरही शिक्षण व अन्य संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. राजकारणातील सत्ता आणि संपत्तीचा वापर लोकांच्या हिताचा नाही, हेच त्यांच्या सकारात्मक राजकारणाने दाखवून दिले. म्हणून तर राजकारणात राहूनही पुढारपणाची झालर त्यांनी कधी चिकटवून घेतली नव्हती. आडनाव पाटील असले तरी ते यामुळेच केवळ ‘यशवंत एकनाथ’ नावानेच महाराष्ट्राला परिचित राहिले.

==संस्था स्थापना==
==संस्था स्थापना==

११:०२, २१ मे २०१७ ची आवृत्ती

यशवंत एकनाथ पाटील (जन्म : बोरिवडे, ४ मार्च १९३०; मृत्यू : कोडोली, १७ मे २०१७) हे एक महाराष्ट्र राज्यच्या विधानसभेतील माजी आमदार होते.

राजकीय कारकीर्द

यशवंत एकनाथ यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावी झाला. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोडोलीच्या सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सन १९५७मध्ये ते कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. सन १९६७पर्यंत ते सदस्य होते. त्यानंतर सेवा संस्थेची स्थापना त्यांनी केली. सन १९६७मध्ये ते जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा व सन १९७२मध्ये दुसर्‍यांदा निवडून गेले. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले. सन १९६८मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी झाले. सन १९७८ ते १९९९ या प्रदीर्घ काळात त्यांनी पन्हाळा, गगनबावडासिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका या मतदारसंघांचे विधानसभेत पाच वेळा वेगवेगळ्या काळी प्रतिनिधित्व केले.

सत्तासंघर्ष

वारणा खोर्‍यातील तात्यासाहेब कोरे आणि यशवंत एकनाथ यांच्यात मोठाच राजकीय संघर्ष होता. शेवटी विनय कोरे यांनी पाचवेळा आमदार झालेल्या यशवंत एकनाथ यांचा १९९९च्या निवडणुकीत पराभव केला.

वसंतरावदादा पाटील यांचे एकनिष्ठ’ म्हणून ‘यशवंत एकनाथ’ यांचे नाव अग्रहक्काने घेतले जाते.

कार्य

आमदारपदाच्या कालावधीत यशवंत एकनाथ यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांसाठी अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. पन्हाळा, गगनबावडासिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मूलभूत गरजांसाठीही आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील ह्यांना सातत्याने कार्यरत रहावे लागले.

विधानसभेत स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकार्‍यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत होती.. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले.

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत पंचवीस वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाले. आठ छोटी-मोठी धरणे बांधण्याबरोबर कधीही वीज न पाहिलेल्या वाड्या-वस्त्यांवर वीज पोहचवत त्यांनी रस्त्यांसह अन्य विकासकामांत आघाडी घेतली. ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम करणार्‍या यशवंत एकनाथ यांनी पदाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती की, स्वार्थी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कुणाकडे कधी भीक मागितली नाही. त्यामुळेच क्षमता असूनही पंचवीस वर्षांत एकदाही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. व्यक्तिमत्त्वात कमालीची जरब, मात्र मनाने दिलदार असणार्‍या या नेत्याला महाराष्ट्र ‘वारणेचा वाघ’ म्हणून ओळखत होता. वसंतदादांबद्दल अपशब्द वापरणार्‍या आमदाराला जागेवरच उचलून फेकणार्‍या पाटील यांची चांगल्या अर्थाने प्रशासनातही ‘दादा’गिरी होती. त्यामुळेच जनेतची कामे तात्काळ व्हायची. सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा नेता शेवटच्या क्षणापर्यंत जनहिताच्या कामात व्यग्र राहिला. आमदारकी गेल्यानंतरही शिक्षण व अन्य संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. राजकारणातील सत्ता आणि संपत्तीचा वापर लोकांच्या हिताचा नाही, हेच त्यांच्या सकारात्मक राजकारणाने दाखवून दिले. म्हणून तर राजकारणात राहूनही पुढारपणाची झालर त्यांनी कधी चिकटवून घेतली नव्हती. आडनाव पाटील असले तरी ते यामुळेच केवळ ‘यशवंत एकनाथ’ नावानेच महाराष्ट्राला परिचित राहिले.

संस्था स्थापना

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोडोली येथे सन १९८२मध्ये यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आयुर्वेदिक महाविद्यालयापासून अनेक प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये दिले जाते.

कौटुंबिक

कुरळप (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांच्या भगिनी वासंती यांच्याशी यशवंत एकनाथ यांचा सन १९५१ मध्ये विवाह झाला.