"लीला सेठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लीला सेठ (Leila Seth) (जन्म : लखनौ, २० ऑक्टोबर, इ.स. १९३०; मृत्यू : नॉयडा, ५ मे...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

लीला सेठ यांच्यामुळेच हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा होऊन मुलींना एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा मिळाला. समलिंगींच्या हक्कांबाबत त्यांनी ‘इंडिया यू आर क्रिमिनल इफ गे’ हा टीकात्मक लेख ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता. ‘शक्तिमान’ या मालिकेचा समाजावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित ‘वुइ दी चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.

==अपत्ये==
विक्रम सेठ, आराधना सेठ, शांतुम सेठ

==लीला सेठ यांनी लिहिलेली पुस्तके==
* We, The Children of India
* On Balance : An Autobiography, more
Children: Vikram Seth, Aradhana Seth, Shantum
Ex-spouse: Prem Seth

१८:१६, ९ मे २०१७ ची आवृत्ती

लीला सेठ (Leila Seth) (जन्म : लखनौ, २० ऑक्टोबर, इ.स. १९३०; मृत्यू : नॉयडा, ५ मे, इ.स. २०१७) या दिल्ली उच्च न्यायालयातील पहिल्या स्त्री-न्यायाधीश होत्या. भारतातील राज्य-उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या स्त्री-सरन्यायाधीश झाल्या.

लीला सेठ यांचा जन्म १९३० मध्ये लखनौत झाला. वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंब सावरण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिक्षणानंतर त्या आसाम रेल लिंक प्रकल्पात स्टेनोग्राफर होत्या. प्रेम सेठ यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या लंडनला गेल्या. तेथे १९५८ मध्ये लंडन बारच्या परीक्षेत पहिल्या आल्या. आयएएससाठी निवड झाल्यानंतरही त्यांनी कायदा व न्यायाचे क्षेत्र निवडले होते. त्यानंतर १९७८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला व त्या १९९१ मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या.

लीला सेठ यांच्यामुळेच हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा होऊन मुलींना एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा मिळाला. समलिंगींच्या हक्कांबाबत त्यांनी ‘इंडिया यू आर क्रिमिनल इफ गे’ हा टीकात्मक लेख ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता. ‘शक्तिमान’ या मालिकेचा समाजावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित ‘वुइ दी चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.

अपत्ये

विक्रम सेठ, आराधना सेठ, शांतुम सेठ

लीला सेठ यांनी लिहिलेली पुस्तके

  • We, The Children of India
  • On Balance : An Autobiography, more

Children: Vikram Seth, Aradhana Seth, Shantum Ex-spouse: Prem Seth