Jump to content

"बाबूराव घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाबूराव घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४) हे महाराष्ट्रातील ‘पु...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
बाबूराव घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४) हे महाराष्ट्रातील ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या खासगी शिक्षण संस्थेचे संस्थापक होत.
बाबूराव माधवराव घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४) हे महाराष्ट्रातील ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या खासगी शिक्षण संस्थेचे संस्थापक होत.

वकिलीचा व्यवसाय करताकरता बाबूराव घोलप यांना शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे कष्टाचे झाले आहे याचा अनुभव आला. इ.स. १९३३साली ते पुणे जिल्हा लोकल बोर्डात ‘चीफ ऑफिसर’ झाले. या ऑफिसच्या कामानिमित्त ते पुण्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांत फिरले. कर्मवीर [[भाऊराव पाटील]] यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी अनुभव घेतला.

ओळ ११: ओळ ११:

बाबूराव घोलपांनंतर [[मामासाहेब मोहोळ]] संस्थेचे प्रमुख झाले. [[अजित पवार]] हे सध्या (२०१७ साली) संस्थाप्रमुख आहेत.
बाबूराव घोलपांनंतर [[मामासाहेब मोहोळ]] संस्थेचे प्रमुख झाले. [[अजित पवार]] हे सध्या (२०१७ साली) संस्थाप्रमुख आहेत.

==आत्मचरित्र==
घोलपांचे ‘मी बाबूराव घोलप’ नावाचे आत्मचरित्र ग्रामविकास व समता विचार व्यासपीठ या संस्थेने प्रकाशित केले आहे.

[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]

००:५२, ५ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

बाबूराव माधवराव घोलप (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९०४) हे महाराष्ट्रातील ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या खासगी शिक्षण संस्थेचे संस्थापक होत.

वकिलीचा व्यवसाय करताकरता बाबूराव घोलप यांना शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे कष्टाचे झाले आहे याचा अनुभव आला. इ.स. १९३३साली ते पुणे जिल्हा लोकल बोर्डात ‘चीफ ऑफिसर’ झाले. या ऑफिसच्या कामानिमित्त ते पुण्याच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या सर्व भागांत फिरले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी अनुभव घेतला.

बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी घोलपांनी ७ सप्टेंबर, १९४१ रोजी ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची सुरुवात ‘गावठी शाळा’ काढण्यापासून झाली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे श्री शिवाजी विद्यालयाची स्थापना करून त्यांनी खर्‍या अर्थाने शिक्षणप्रसाराच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ते स्वतः गावोगावी बैलगाडीने, सायकलीवरून, एस्‌टीच्या बसने आणि प्रसंगी पायी प्रवास करून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. बहुजन समाजातल्या मुलांसाठी त्यांनी शाळा काढल्या या शाळा देवळांत, गुरांच्या गोठ्यांत किंवा झाडाखाली भरत असत.

शिक्षणयोगी बाबूराव घोलपांची शिक्षणाबद्दलची तळमळ पाहून त्यांच्यासाठी गावोगावी मदतीचे हात पुढे आले. लोकांनी श्रमदानाने शाळांच्या इमारती बांधल्या.

संस्थेचा विस्तार

बाबूराव घोलप यांच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेची २०१६ सालापर्यंत ९ प्राथमिक विद्यालये, ६१ माध्यमिक, व ३१ उच्च माध्यमिक विद्यालये सुरू झाली आहेत. शिवाय ८ उच्च महाविद्यालये, व्यवसाय अध्यापनाच्या २५ शाळा, १२ व्यावसायिक महाविद्यालये आणि एकएक वैद्यकीय, इंजिअनिअरिंग, फार्मसी कॉलेज, एक एम.बी.ए. कॉलेज, एक विधी महाविद्यालय आणि एक बी.एड. कॉलेज आहे; शिवाय सेवक कल्याण निधीमधून निर्माण झालेली एक सहकारी पतसंस्था व एक ग्राहक विद्यार्थी भांडार आहे.

बाबूराव घोलपांनंतर मामासाहेब मोहोळ संस्थेचे प्रमुख झाले. अजित पवार हे सध्या (२०१७ साली) संस्थाप्रमुख आहेत.

आत्मचरित्र

घोलपांचे ‘मी बाबूराव घोलप’ नावाचे आत्मचरित्र ग्रामविकास व समता विचार व्यासपीठ या संस्थेने प्रकाशित केले आहे.