"कृष्णा बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३) हे एक मराठी नाट्यसृष्टीतले निवृत्त...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

०१:०४, २५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३) हे एक मराठी नाट्यसृष्टीतले निवृत्त रंगभूषाकार आहेत. वयाच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी हे काम करायला सुरुवात केली.

गोव्यातले बोरी हे कृष्णा बोरकर यांचे मूळ गाव असून, पोर्तुगीजांच्या राजवटीत ज्या काही कुटुंबांनी गोवा सोडले त्यांत कृष्णा बोरकरांचे कुटुंब होते. बोरीहून निघाल्यावर ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिंचखरी गावी आले. मुंबईत सिद्धिविनायक मंदिराजवळच्या कलकत्तावाला चाळीत ते राहू लागले. वडिलांचे निधन झाल्याने आई त्यांना व त्यांच्या बहिणीला घेऊन इ.स. १९३८च्या सुमारास मुंबईत आली. काही दिवसांसाठी लहानग्या कृष्णाला त्यांचे ज्योतिषी असलेले चुलतकाका यांचेकडे रहावे लागले, पण थोड्याच दिवसात आईने त्यांना पुन्हा कलकत्तावाला चाळीत आणले.

कलकत्तावाला चाळीच्या जवळपास नाटकाचे पडदे रंगवण्याचे काम करणारे पांडुरंग हुले रहात असत. ते कसे काम करीत हे कृष्णा न्याहाळत बसे. एकदा पांडुरंग हुले यांनी कृष्णा बोरकरांना दामोदर हॉलमधे एका नाटकाला नेले. त्या नाटकासाठी हुले सांगतील ते काम कृष्णाने केले आणि त्याबद्दल त्यांना आठ आणे मिळाले. हुलेंबरोबर असेच काम करीत असताना कृष्णा बोरकर यांना पात्रांच्या रंगभूषांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांनी कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या ‘सूडाची प्रतिज्ञा’ या नाटकासाठी पहिल्यांदा स्वतंत्रपणे रंगभूषा केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त ११ होते. त्या अनुभवावर कृष्णा बोरकर यांना केव्हाकेव्हा रंगभूषाकाराची कामे मिळू लागली.

पुढे काही वर्षे कृष्णा बोरकर हे भुलेश्वर येथील विविध प्रकारचे ड्रेस भाड्याने देणार्‍या एका दुकादाराकडे काम करू लागले. या प्रकारचे दुकान चालवणारे ते एकमेव मराठी दुकानदार होते. तेथे त्यांची भेट महाराष्ट्र नाटक कंपनीचे रंगभूषाकार कमलाल्कर टिपणीस भेटले. त्यांच्या शिफारशीमुळे कृःणा बोरकर यांना एका चित्रपटातील नटांना रंगवण्याचे काम मिळाले. राजकमल चित्रपटसंस्थेचे रंगभूषाकार बाबा वर्दम एकदा आलेले नसताना अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा करायला मिळाली आणि ती पाहून व्ही. शांताराम यांनी स्वतःची रंगभूषाही त्यांच्याकडून करून घेतली.

कृष्णा बोरकर यांची रंगभूषा असलेली नाटके आणि चित्रपट

  • गगनभेदी
  • गरुडझेप
  • गारंबीचा बापू
  • गुडबाय डॉक्टर
  • दीपस्तंभ
  • दो आँखे बारा हाथ (चित्रपट)
  • नवरंग (चित्रपट)
  • पृथ्वी गोल आहे
  • मौसी (चित्रपट)
  • रमले मी
  • रणांगण : या नाटकातील १७ कलावंतांना ६५ प्रकारच्या रंगभूषा कराव्या लागल्या.
  • शिवसंभव
  • सूडाची प्रतिज्ञा
  • स्वामी
  • हे बंध रेशमाचे

कृष्णा बोरकर यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलेल्या नाट्यसंस्था आणि चित्रसंस्था

कृष्णा बोरकर यांनी रंगवलेले कलावंत

पुरस्कार

  • १९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक
  • गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार
  • भारताचे राष्ट्रपती प्रणव मुकर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी केलेले सन्मान आणि दिलेले पुरस्कार


[अपूर्ण)