Jump to content

"वामन होवाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वामन होवाळ (जन्म : तडसर-सांगली जिल्हा, इ.स. १९३५; मृत्यू : विक्रोळी-म...
(काही फरक नाही)

१४:५१, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

वामन होवाळ (जन्म : तडसर-सांगली जिल्हा, इ.स. १९३५; मृत्यू : विक्रोळी-मुंबई, २३ डिसेंबर, इ.स.२०१६) हे एक मराठी साहित्यिक होते. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आधी ठाण्यात आणि नंतर फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रेल्वेत नोकरीला लागले.

वामन होवाळ यांची पहिली माणूस ही कथा इ.स. १९६३मध्ये कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत गेल्या.

दलितांची दुःखे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी लेखनाचा मार्ग पत्करणार्‍या होवाळ यांनी आपले वाढत्या वयातही त्यांचे लेखन सुरुच ठेवले होते. पानतावणे यांच्या अस्मितादर्श नियतकालिकाने पदरमोड करून दलित साहित्यातील अनेक लेखकांना हक्काचे व्यासपीठ दिले; होवाळ त्यांपैकी एक होते. दलित साहित्यिकांच्या पहिल्या फळीत वामन होवाळ यांचे नाव घेतले जात होते. पण आपल्या दलितत्त्वाचे भांडवल मात्र त्यांनी फारसे केले नाही. दलित- शोषितांचे विदारक जग मांडत असताना आणि समाज परिवर्तनासाठी झटत असतानाही होवाळ यांचे लेखन हे प्रचारकी नसल्याचे नेहमीच सांगितले जायचे. दलित साहित्याला वामन होवाळ यांच्या लेखणीने नवी उंची गाठून दिली.

अनुवाद

त्यांच्या ‘मजल्याचं घर’, ‘पाऊसपाणी’ या कथांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांत अनुवाद झाले आहेत. अन्य काही कथा हिंदी, उर्दू आणि कन्‍नड भाषांतही अनुवादित झाल्या आहेत.

कथाकथन

शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकर यांच्या नंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र वामन होवाळ यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या कथांमधून दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन घडते. मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांनी त्यांच्या कथांमधून रेखाटले.

अभिनय

वामन होवाळ यांनी सदाशिव अमरापूरकर यांच्या चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती.

वामन होवाळ यांचे प्रकाशित साहित्य

  • ऑडिट (कथासंग्रह)
  • आंधळ्याची वरात बहिर्‍च्या घरात (लोकनाट्य)
  • आमचीकविता (संपादन)
  • जपून पेरा बेणं (लोकनाट्य)
  • बेनवाड (कथासंग्रह)
  • येळकोट (कथासंग्रह)
  • वाटाआडवाटा (कथासंग्रह)
  • वारसदार (कथासंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान


.