"ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप... |
(काही फरक नाही)
|
२२:३५, २० नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप अाहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यकीला हा पुरस्कार मिळतो. या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो.
ज्ञानॊबा तुकराम पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
- रा.चिं. ढेरे
- डॉ. दादा महाराज मनमाडकर
- जगन्नाथ महाराज नाशिककर
- रामकृष्ण महाराज लवितकर
- डॉ. यु.म. पठाण
- प्रा. रामदास डांगे
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
- मारोती महाराज कुऱ्हेकर
- डाॅ, उषा देशमुख