Jump to content

"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अबू सलीम इत्यादी गुंडांव्या नुसत...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

०७:३०, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अबू सलीम इत्यादी गुंडांव्या नुसत्या नावाने देखील मुंबईतील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर आदी भरपूर पैसे मिळवणारे व्यावसायिक घाबरत असत. आणि तरीसुद्धा असल्या गुंडांना जास्तीच्या आकर्षक टोपणनावाची गरज भासते. ही टोपणनावे त्या गुंडाच्या दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर किंवा कार्यपद्धतीवरून पडतात. शेख शकील बाबू मोहिद्दीन शेख हा त्याच्या बुटकेपणामुळे छोटा शकील म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा हाडवैरी राजेंद्र सदाशिव निकाळजे हा छोटा राजन या नावाने कुप्रसिद्ध आहे. त्याचा गुरू राजन नायर हा बडा राजन या नावाने ओळखला जाई, म्हणून हा छोटा राजन. छोटा राजनला अजूनही काही लोक नाना (म्हणजे गुजराथीत छोटा) म्हणतात.

छोटा शकीलशी गल्लत होऊ नये म्हणून दाऊद गँगच्या उंच्यापुर्‍या शकीलला लंबू शकील म्हणतात. इक्बाल मोहंमद अली मेमन हा बेकायदेशीर ड्रग व्यवसायात येण्यापूर्वी मिरच्या विकायचा, म्हणून त्याला इकबाल मिर्ची म्हणतात.

महाराष्ट्रातील काही गुंड आणि त्यांची टोपणनावे पुढे दिली आहेत.

गुंडांची खरी आणि टोपण नावे

  • अजय उर्फ कन्नू (सोनपत-हरियाणा)
  • अनिल ऊर्फ तिर्‍या ढोम्या काळे (१९८६)
  • अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (१९६२)
  • दाऊदच्या टोळीतील अनिल परब ऊर्फ वांग्या
  • नंदगोपाल पांडे उर्फ फौजी (आरा-बिहार)
  • छोटू उर्फ कैलाश (पलवल-हरियाणा)
  • अरुण गवळी ऊर्फ डॅडी
  • अमित कुमार उर्फ बच्चा राय (बिहार; हा वयाच्या १९व्या वर्षी महाविद्यालयाचा प्राचार्य झाला, आणि त्या कॉलेजातून शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ लागले.)
  • फहीम उर्फ कल्लू मोहम्मद कासीम (बदायून-उत्तर प्रदेश)
  • सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)
  • आलमगीर उर्फ रोनी (जौनपूर-उत्तर प्रदेश)
  • ओबैदुर्रहमान उर्फ बाबू भाई (जौनपूर-उत्तर प्रदेश)
  • रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)
  • बाबा राम शंकर तिवारी उर्फ स्वामी परमानंद (बाराबंकी-उत्तर प्रदेश)
  • अरुण गवळीच्या टोळीतील गणेश भोसले ऊर्फ वकील
  • अरुण गवळीच्या टोळीतील दिलीप कुलकर्णी ऊर्फ डीके
  • आप्पा मारुती कुंजी ऊर्फ प्रवीण
  • काळू दुर्गाप्पा पवार ऊर्फ नागेश
  • गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे
  • छोटा राजन टोळीतील ओमप्रकाश ऊर्फ ओपी
  • छोटा राजन टोळीतील जनार्दन रामचंद्र पासी ऊर्फ रॉबर्ट ऊर्फ जना भैय्या
  • छोटा राजन टोळीतील रमेश सुर्वे ऊर्फ रम्या बटलर
  • छोटा राजन टोळीतील रवी मल्लेश बोरा ऊर्फ डीके राव
  • डोळा कळसिंग भोसले ऊर्फ आकाश (१९९६)
  • बाबा राम शंकर तिवारी उर्फ स्वामी परमानंद (बाराबंकी-उत्तर प्रदेश)
  • नामदेव यमराज भोसले ऊर्फ मथ्या (१९९७)
  • नीलेश सुरेश भोसले ऊर्फ गोविंद(१९९६)
  • गजा मारणे टोळीतील पप्पू ऊर्फ अतुल लक्ष्मण कुडले
  • नीलेश घायवळ टोळीतील पप्पू ऊर्फ संतोष गावडे (गजा मारणे टोळीकडून खून : ३-११-२०१४)
  • परसू दुर्गाप्पा पवार ऊर्फ प्रशांत
  • दाऊदच्या टोळीतील फिरोज अब्दुल्ला सरगुरू ऊर्फ फिरोज कोकणी
  • मारुती मुत्ताप्पा पवार उर्फ जेटली
  • राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन
  • दाऊदच्या टोळीतील शकील अहमद मोहंमद मुर्सलीन शेख ऊर्फ लंबू शकील
  • सचिन अशोक काळे ऊर्फ नागेश (१९८४)
  • सदा पावले ऊर्फ सदामामा पावले
  • सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या (निधन २४-१२-२०१५)
  • यल्लाप्पा बापू पवार ऊर्फ मोन्या
  • दाऊदच्या टोळीतील जॉन पीरस्वामी ऊर्फ काल्या ऍन्थनी
  • सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या (मृत्यू : २३-१२-२०१५) : सातारा

महाराष्ट्राबाहेरचे गुंड आणि त्यांची टोपणनावे

  • रंजन उर्फ जूड्डी (सोनपत-हरियाणा)