Jump to content

"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्ण हळदणकर. हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत.. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मनोरम संगम आहे.. नामवंत गायकांकडून संगीत शिकलेले अनेक गायक पं. बबनराव हळदणकरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे आपले भाग्य मानतात.

==संगीत शिक्षण==
हळदणकरांनी सुरुवातीला [[मोगूबाई कुर्डीकर]]ांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. मात्र पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतल्यावर त्यांना आग्रा घराण्यात आपले स्वत्व सापडले. आग्रा घराण्याचा डौल आणि लयकारी यातच त्यांचा जीव रमला. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.

==पसरत गेलेली खाती==
[[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] गायकीतला डौल आणि त्यातली परिपक्वता अत्यंत डोळसपणे मांडणारा गायक म्हणून हळदणकरांची ख्याती १९६०च्या दशकात पसरू लागली. आग्रा घराण्याची खासीयत म्हणजे ध्रुपद धमाराशी असलेली या गायकीची नाळ. त्यामुळे नोमतोम आलापाने एखादा राग मांडण्याची कसलेल्या आग्रा घराण्याच्या गायकाची हातोटी असते. हळदणकरांकडून 'दरबारी', 'मियाँकी तोडी', 'मलुहा केदार' वगैरे रागातले नोमातोम आलाप ऐकताना याचा प्रत्यय येतो.

==लयकारीवरचे प्रभुत्व==
बबनराव हळदणकर यांचे लयकारीवर विशेष प्रभुत्व आहे. चाण्गला तबलजी असला की लयकारीचे अनेकरंगी आविष्कार हळदणकरांकडून ऐकायला मिळतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य हवे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रा गायकीचा प्राण तिच्या बोजदारपणात किंवा भारदस्तपणात आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने ते ही गायकी मांडत आले आहेत.

==आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार==
==आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार==
बबनराव हळदणकर यांचे संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतःचे असे खास स्थान आहे. [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] समर्थ भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे त्यांच्याकडे पाहिले गेले.. [[आग्रा घराणे]] हे थेट ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्याचा बराच बोलबाला होता. काळाच्या ओघात हे घराणे मागे पडले. आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती सुबुद्धपणे मांडणार्‍या समर्थ गायकीची आणि भाष्यकाराची अशावेळी नितांत आवश्यकता होती. महाराष्ट्रात हळदणकरांच्या रूपाने आणि बंगालमध्ये विजय किचलूंच्या रूपाने आग्रा गायकीला असे भाष्यकार गवसले.

==अध्यापन आणि संशोधन==
हळदणकरांनी गोवा कला अकादमी, [[खैरागढचे]] संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले. अध्यापनं केलं. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले.

==अध्यापन==
बबनराव हळदणकरांनी मुक्त हस्ताने विद्यादान केले. [[अरुण कशाळकर]], वृंदा मुंडकूर, [[देवकी पंडित]], डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर अशा अनेक शिष्यांना त्यांच्याकडून विद्याधन मिळाले.

==टोपण नाव==
==टोपण नाव==
रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.
आग्रा घराण्यातील बहुतेकांना जशी टोपण नावे अस्तात तसेच बबनरावांनाही आहे. '''रस पिया''' हे बबनरावांचे टोपणनाव.

==संगीचे कार्यक्रम==
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.

ओळ १२: ओळ २८:
* जुळू पहाणारे दोन तंबोरे
* जुळू पहाणारे दोन तंबोरे

==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान (अनेक)==
* रागदारी संगीताच्या क्षेत्रात निरलसपणे आणि निरपेक्षपणे कार्य करून ज्याने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, अशा ज्येष्ठ संगीत साधकाला देण्यात येणारा ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार - एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह (१४-१-२०१२)

* पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
* पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
* कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.

१५:२७, ७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्ण हळदणकर. हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत.. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मनोरम संगम आहे.. नामवंत गायकांकडून संगीत शिकलेले अनेक गायक पं. बबनराव हळदणकरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे आपले भाग्य मानतात.

संगीत शिक्षण

हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. मात्र पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतल्यावर त्यांना आग्रा घराण्यात आपले स्वत्व सापडले. आग्रा घराण्याचा डौल आणि लयकारी यातच त्यांचा जीव रमला. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.

पसरत गेलेली खाती

आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातली परिपक्वता अत्यंत डोळसपणे मांडणारा गायक म्हणून हळदणकरांची ख्याती १९६०च्या दशकात पसरू लागली. आग्रा घराण्याची खासीयत म्हणजे ध्रुपद धमाराशी असलेली या गायकीची नाळ. त्यामुळे नोमतोम आलापाने एखादा राग मांडण्याची कसलेल्या आग्रा घराण्याच्या गायकाची हातोटी असते. हळदणकरांकडून 'दरबारी', 'मियाँकी तोडी', 'मलुहा केदार' वगैरे रागातले नोमातोम आलाप ऐकताना याचा प्रत्यय येतो.

लयकारीवरचे प्रभुत्व

बबनराव हळदणकर यांचे लयकारीवर विशेष प्रभुत्व आहे. चाण्गला तबलजी असला की लयकारीचे अनेकरंगी आविष्कार हळदणकरांकडून ऐकायला मिळतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य हवे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रा गायकीचा प्राण तिच्या बोजदारपणात किंवा भारदस्तपणात आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने ते ही गायकी मांडत आले आहेत.

आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार

बबनराव हळदणकर यांचे संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतःचे असे खास स्थान आहे. आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे त्यांच्याकडे पाहिले गेले.. आग्रा घराणे हे थेट ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्याचा बराच बोलबाला होता. काळाच्या ओघात हे घराणे मागे पडले. आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती सुबुद्धपणे मांडणार्‍या समर्थ गायकीची आणि भाष्यकाराची अशावेळी नितांत आवश्यकता होती. महाराष्ट्रात हळदणकरांच्या रूपाने आणि बंगालमध्ये विजय किचलूंच्या रूपाने आग्रा गायकीला असे भाष्यकार गवसले.

अध्यापन आणि संशोधन

हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले. अध्यापनं केलं. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले.

अध्यापन

बबनराव हळदणकरांनी मुक्त हस्ताने विद्यादान केले. अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर अशा अनेक शिष्यांना त्यांच्याकडून विद्याधन मिळाले.

टोपण नाव

आग्रा घराण्यातील बहुतेकांना जशी टोपण नावे अस्तात तसेच बबनरावांनाही आहे. रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.

संगीचे कार्यक्रम

भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.

ग्रंथलेखन

  • जुळू पहाणारे दोन तंबोरे

पुरस्कार आणि सन्मान (अनेक)

  • रागदारी संगीताच्या क्षेत्रात निरलसपणे आणि निरपेक्षपणे कार्य करून ज्याने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, अशा ज्येष्ठ संगीत साधकाला देण्यात येणारा ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार - एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह (१४-१-२०१२)
  • पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
  • कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.