"देव मामलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: देव मामलेदार यांचा जन्म सोेलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्या... |
(काही फरक नाही)
|
२३:५२, २७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
देव मामलेदार यांचा जन्म सोेलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावी १३ सप्टेंबर, इ.स. १८१५ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत महादेव भोसेकर होते. इ.स. १८२९ ते १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात १८७०-७१ दरम्यान [[नाशिक[[ जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळेसे येथे मामलेदार असलेले यशवंतराव भोसेकर यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख २७ हजार रुपये नागरिकांना वाटले. त्यामुळे बागलाण तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला धावणार्या तहसीलदाराला देवत्व दिले. त्यांच्या सत्प्रवृत्त वृत्तीमुळे व कार्यामुळे लोक त्यांना देव मामलेदार वा यशवंत महाराज अशा नावाने ओळखू लागले. त्यांच्या मृत्यूनंतर बागलाण तालुक्यातील सटाणा या गावी त्यांचे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याची रोज पूजा केली जाते. मंदिरात धार्मिक पारायणे होतात. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी १९०० मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी हा यात्रोत्सव होतो. १५ दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो.
यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचा २७ डिसेंबर १८८७ रोजी नाशिक येथे मृत्यू झाला. नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला 'यशवंतराव महाराज पटांगण' असे नाव दिले.