"मानसी कणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मानसी शिरीष कणेकर (आधीच्या सौ. आरती अनिल हवालदार, पूर्वाश्रमी...
(काही फरक नाही)

०६:४५, २७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

डॉ. मानसी शिरीष कणेकर (आधीच्या सौ. आरती अनिल हवालदार, पूर्वाश्रमीच्या भारती रामचंद्र मराठे) (निधन : ऑगस्ट, इ.स. २०१६) या एक चतुरस्र लेखिका, कवयित्री-गायिका होत्या. संजीवनी मराठे यांच्या त्या कन्या. त्यांचे पती अनिल हवालदार आणि शिरीष कणेकर हे दोघेही लेखक होत.

मानसी कणेकर यांचे इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते. त्या उत्तम गझल लिहीत आणि गातही.

मानसी कणेकर यांनी तर वयाच्या २९व्या वर्षी अनुवादशास्त्रात पीएच.डी. मिळवली होती. लॉर्का या प्रसिद्ध स्पॅनिश नाटककाराची तीन नाटके त्यांनी मराठीत अनुवादित केली होती.

ज्ञानदेव महाराजांच्या अभंगांचा अतिशय सूक्ष्म आणि रसाळ आशय लिहिण्याचे काम मानसी कणेकर यांनी हातावेगळे केले होते.

सिम्बोलिझम (प्रतीकशास्त्र) या विषयाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. डॉ. मानसी कणेकर यांची पुस्तके आध्यात्मिक चित्रकार शिवानंद यांच्या प्रतीकांतून बोलणार्‍या चित्रांनी सजलेली असत.

डॉ. मानसी कणेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनुभावामृत अनुभावामृतपण (संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावरचे भाष्य)
  • चांगुणा (नाटक)
  • ममा (मसाला मानसीचा) - पाकशास्त्रावरील माहितीपूर्ण पुस्तक
  • वाडा भवानी आईचा
  • सप्‍तपुत्तलिका
  • सुनीलतारा (योगशास्त्रातील ज्ञानदेवी तेहतिशी या प्रकरणावरचे अभ्यासपूर्वक लिहिलेले पुस्तक)
  • सौंदर्यलहरी (आदी शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी स्तोत्राचा अभ्यास करून श्री यंत्र उपासनेवर लिहिलेले पुस्तक)
  • क्षणतरंग (मूळ हिंदी, लहेरों के राजहंस लेखक - मोहन मोहन)

डॉ. मानसी कणेकर यांनी गायलेली गीते

(अपूर्ण)