"डेव्हिड सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्र... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==डेव्हिड सेन यांचे संशोधन== |
==डेव्हिड सेन यांचे संशोधन== |
||
प्राध्यापक सेन यांनी रुक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणार्या वनस्पतींवर संशोधन केले. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपट्यांची वाढ आणि उष्णतेमध्ये जिवंत राहण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन जगभरात महत्त्वाचे ठरले. या कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.), विज्ञान आणि उद्योग संशोधन संस्था (सी.एस.आय.आर)., विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डी.एस.टी) वगैरेंकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले, १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी परिस्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे. |
प्राध्यापक सेन यांनी रुक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणार्या वनस्पतींवर संशोधन केले. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपट्यांची वाढ आणि उष्णतेमध्ये जिवंत राहण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन जगभरात महत्त्वाचे ठरले. या कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.), विज्ञान आणि उद्योग संशोधन संस्था (सी.एस.आय.आर)., विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डी.एस.टी) वगैरेंकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले, १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी परिस्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे. |
||
प्रा. सेन यांना हिंदी, उर्दू, इंग्लिश, जर्मन, झेक या भाषा अवगत होत्या. युरोपमधील बहुतेक सर्व देशांत ते कामानिमित्त फिरले होते. |
|||
==नियतकालिकांची स्थापना== |
|||
स्वतःच्या संशोधनाबरोबर तरुण संशोधकांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. सेन यांनी १९७४ मध्ये जोधपूरमधून ‘जिओबायोस’ (Geobios) हे द्वैमासिक सुरू केले. अतिशय नियमितपणे प्रसिद्ध होणारे जर्नल असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी १९८१ मध्ये ‘इंडिअन रिव्हू ऑफ लाइफ सायन्सेस’ हे वार्षिक जर्नल आणि नंतर १९८२ मध्ये ‘जिओबायोस न्यूज रिपोर्ट्स’ सुरू केले. त्यांचा कामाचा धडाका अपूर्व होता. |
|||
==संस्थाकीय कार्य== |
|||
प्रा. सेन हे इंडियन बोटॅनिकल सोसायटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीचे व अॅरिड झोन रिसर्च असोसिएशनचे फेलो आणि वीड आयडेंटिफिकेशन व टर्मिनॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. ऑस्ट्रियातील आंतरराष्ट्रीय मुळे संशोधन समूहाचे (International Society of Root Research)चे ते सदस्य होते. |
|||
==पुस्तके== |
|||
* Contributions to the Ecology of Halophytes (संपादित, सहसंपादक - डॉ. किशनसिंग राजपुरोहित) |
|||
* Ecophysiological Studies on Weeds of Cultivated Fields with special reference to बाजरा (Pennisetum typhoideum) and तिल (Sesamum indicum) crops |
|||
* Structure Function and Ecology of Stomata (सहलेखक - डी.डी. चव्हाण, रामसेवक पूरणचंद बन्सल) |
|||
==निधन== |
|||
प्रा. डेव्हिड सेन यांचे जानेवारी २०१६ मध्ये निधन झाले. |
|||
१६:१७, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण आग्रा विद्यापीठात झाले. भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते झेकोस्लोव्हाकियातील प्राग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेले. त्या विद्यापीठाने बियांवरील संशोधन कार्याबद्दल डी.एस्सी. देऊन त्यांना गौरवले. भारतात परतल्यावर ते १९६३ मध्ये जोधपूर विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि सन १९९३ मध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले.
डेव्हिड सेन यांचे संशोधन
प्राध्यापक सेन यांनी रुक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणार्या वनस्पतींवर संशोधन केले. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपट्यांची वाढ आणि उष्णतेमध्ये जिवंत राहण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन जगभरात महत्त्वाचे ठरले. या कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.), विज्ञान आणि उद्योग संशोधन संस्था (सी.एस.आय.आर)., विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डी.एस.टी) वगैरेंकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले, १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी परिस्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे.
प्रा. सेन यांना हिंदी, उर्दू, इंग्लिश, जर्मन, झेक या भाषा अवगत होत्या. युरोपमधील बहुतेक सर्व देशांत ते कामानिमित्त फिरले होते.
नियतकालिकांची स्थापना
स्वतःच्या संशोधनाबरोबर तरुण संशोधकांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. सेन यांनी १९७४ मध्ये जोधपूरमधून ‘जिओबायोस’ (Geobios) हे द्वैमासिक सुरू केले. अतिशय नियमितपणे प्रसिद्ध होणारे जर्नल असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी १९८१ मध्ये ‘इंडिअन रिव्हू ऑफ लाइफ सायन्सेस’ हे वार्षिक जर्नल आणि नंतर १९८२ मध्ये ‘जिओबायोस न्यूज रिपोर्ट्स’ सुरू केले. त्यांचा कामाचा धडाका अपूर्व होता.
संस्थाकीय कार्य
प्रा. सेन हे इंडियन बोटॅनिकल सोसायटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीचे व अॅरिड झोन रिसर्च असोसिएशनचे फेलो आणि वीड आयडेंटिफिकेशन व टर्मिनॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. ऑस्ट्रियातील आंतरराष्ट्रीय मुळे संशोधन समूहाचे (International Society of Root Research)चे ते सदस्य होते.
पुस्तके
- Contributions to the Ecology of Halophytes (संपादित, सहसंपादक - डॉ. किशनसिंग राजपुरोहित)
- Ecophysiological Studies on Weeds of Cultivated Fields with special reference to बाजरा (Pennisetum typhoideum) and तिल (Sesamum indicum) crops
- Structure Function and Ecology of Stomata (सहलेखक - डी.डी. चव्हाण, रामसेवक पूरणचंद बन्सल)
निधन
प्रा. डेव्हिड सेन यांचे जानेवारी २०१६ मध्ये निधन झाले.