"डेव्हिड सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्र...
(काही फरक नाही)

१६:०६, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण आग्रा विद्यापीठात झाले. भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते झेकोस्लोव्हाकियातील प्राग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेले. त्या विद्यापीठाने बियांवरील संशोधन कार्याबद्दल डी.एस्‌सी. देऊन त्यांना गौरवले. भारतात परतल्यावर ते १९६३ मध्ये जोधपूर विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि सन १९९३ मध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले.

डेव्हिड सेन यांचे संशोधन

प्राध्यापक सेन यांनी रुक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणार्‍या वनस्पतींवर संशोधन केले. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपट्यांची वाढ आणि उष्णतेमध्ये जिवंत राहण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन जगभरात महत्त्वाचे ठरले. या कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.), विज्ञान आणि उद्योग संशोधन संस्था (सी.एस.आय.आर)., विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डी.एस.टी) वगैरेंकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले, १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी परिस्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे.