Jump to content

"फणस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.

==इतर नावे==
==इतर नावे==
* इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
* इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
* कानडी : कुज्जा, तागे, पनेसा, हलासिना
* कानडी : कुज्जा, तागे, पनस, हलसु, हलासिना
* गुजराथी : वणस
* गुजराथी : वणस
* शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
* शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
ओळ १२: ओळ १३:
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चार किंवा चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्‍यामध्ये एक बी असते. तिला आठळी किंवा आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गर्‍याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात.

फणसालाकिंवा त्याच्या झाडाला '''निचूळ''' असाही एक शब्द आहे.

== प्रकार ==
== प्रकार ==

१२:३६, १० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

फणसाच्या झाडाला लागलेले फणस
फणस
बरक्या फणसाचे गरे

फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे.

इतर नावे

  • इंग्रजी  : Jack Fruit, Jack-orange Wood
  • कानडी : कुज्जा, तागे, पनस, हलसु, हलासिना
  • गुजराथी : वणस
  • शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
  • संस्कृत : कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस
  • हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चार किंवा चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्‍यामध्ये एक बी असते. तिला आठळी किंवा आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गर्‍याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात.

फणसालाकिंवा त्याच्या झाडाला निचूळ असाही एक शब्द आहे.

प्रकार

फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

बरका

बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात.

कापा

कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.

विलायती फणस

फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात. सकल्या आणि डगूळ याही फणसाच्या जाती आहेत.

लागवड

फणसाची महाराष्ट्रातील कोकण भागात लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.

फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ

  • फणसाच्या साकट्याची भाजी
  • कच्च्या फणसाच्या गर्‍यांची भाजी
  • सांजणे (फणस इडली)
  • तळलेले गरे
  • फणसाची साठे (फणस पोळ्या)
  • आठळ्यांची भाजी
  • पावेची भाजी
  • उकडलेल्या आठळ्या

फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विडयाचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे.

फणसाचे उपयोग

झाडाचे लाकूड खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी वगैरेंसाठी उत्तम असते.

बाह्य दुवे

  • http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9557&Itemid=2. Missing or empty |title= (सहाय्य)

हेसुद्धा पहा