"जानवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जानवे''' किंवा '''यज्ञोपवीत''' तथा '''ब्रह्मसूत्र''' हे [[हिंदू]] धर्मातील प्रतीक आहे. [[यज्ञ|यज्ञाने]] पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते. |
'''जानवे''' किंवा '''यज्ञोपवीत''' तथा '''ब्रह्मसूत्र''' हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे [[हिंदू]] धर्मातील एक प्रतीक आहे. [[यज्ञ|यज्ञाने]] पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते. |
||
== वर्णन == |
== वर्णन == |
||
जानवे हे नऊ प्रकारच्या |
जानवे हे नऊ प्रकारच्या तंतूंपासून बनलेले असते. या प्रत्येक तंतूवर ओंकार, [[अग्नी]], [[नाग]], प्रजापती, पितृक, [[वायू]], विश्वदेव, [[सूर्य]] आणि सोम अशा नऊ देवांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. हे नऊ तंतू तीन सूत्रांमध्ये बांधलेले असतात. तेथे ब्रह्मगाठ असते. या ब्रह्मगाठीवर आणि तिन्ही सूत्रांवर चार [[वेद|वेदांची]] स्थापना केली असल्याचे समजले जाते. |
||
== यज्ञोपवीत धारण विधी == |
== यज्ञोपवीत धारण विधी == |
१३:५०, ३० जून २०१६ ची आवृत्ती
जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते.
वर्णन
जानवे हे नऊ प्रकारच्या तंतूंपासून बनलेले असते. या प्रत्येक तंतूवर ओंकार, अग्नी, नाग, प्रजापती, पितृक, वायू, विश्वदेव, सूर्य आणि सोम अशा नऊ देवांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. हे नऊ तंतू तीन सूत्रांमध्ये बांधलेले असतात. तेथे ब्रह्मगाठ असते. या ब्रह्मगाठीवर आणि तिन्ही सूत्रांवर चार वेदांची स्थापना केली असल्याचे समजले जाते.
यज्ञोपवीत धारण विधी
उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो-
ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः
या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो.