"सतीश बहादूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. सतीश बहादूर (जन्म : मुरादाबाद, २६ नोव्हेंबर, इ.स. १९२५, मृत्यू :...
(काही फरक नाही)

१३:२९, ३० जून २०१६ ची आवृत्ती

प्रा. सतीश बहादूर (जन्म : मुरादाबाद, २६ नोव्हेंबर, इ.स. १९२५, मृत्यू : पुणे, २३ जुलै, इ.स. २०१०) हे चित्रपट रसास्वादाचे भारतातील पहिले प्राध्यापक होते. त्यांनी १९६३ ते १९८३ या काळात पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापन केले. सतीश बहादुरांनी प्रेक्षकांना चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहण्याची दृष्टी दिली.

प्रा. बहादूर हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुराराबादचे होते. १९५१-१९६३ या काळात त्यांनी आग्रा आणि कानपूर येथील पोस्ट-ग्रॅज्युएट कॉलेजांत अर्थशास्त्राचे अध्यापन केले. काव्य, चित्र, संगीत या कलांमध्ये त्यांना विशेष रस होता. आग्रा येथे फिल्म सोसायटीच्या माध्यमातून चित्रपट रसास्वादाची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा रुजवली. रंगभूमी आणि चित्रपट या कलांमधील संबंधही त्यांनी उलगडून दाखवला. पुण्यात आल्यानंतरही ते भारतभर हिंडून चित्रपट माध्यमाची ओळख करून देत राहिले. चित्रपट माध्यम म्हणून समजावून देताना रसिक अभ्यासकांना नवे आयाम देण्याचे काम त्यांनी केले.

लेखन

प्रा. सतीश बहादूर यांचे लेखन एकत्रित स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे पुण्यातील अक्षर वाङ्मय प्रकाशनानेे प्रा. सतीश बहादूर (चित्रपटभाषा) नावाचा एक विशेष अंक काढला आहे. डॉ. श्यामला वनारसे या अंकाच्या अतिथी संपादक असून, डॉ. अरुण प्रभुणे या अंकाचे कार्यकारी संपादक आहेत.