"वा.द. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, १७ एप्रिल, इ.स. २००१) हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते. |
प्रा. डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, १७ एप्रिल, इ.स. २००१) हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते. |
||
डॉ. वा..द.वर्तक यांचे शिक्षण पुण्यात झाले. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात शिकत असताना प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, [[गोवा|गोव्यापर्यंतची]] [[सह्याद्री]]ची पर्वतराजी येथे ते झाडे बघत आणि त्यांचा अभ्यास करीत पायी फिरले होते. [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात त्यांनी दहा वर्षे [[वनस्पतिशास्त्र|वनस्पतिशास्त्राचे]] अध्यापन केले. त्यानंतर प्रा. [[शंकर पुरुषोत्तम आघारकर]] यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी तेथे डॉ. आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. वर्तक यांनी वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले. |
डॉ. वा..द.वर्तक यांचे शिक्षण पुण्यात झाले. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात शिकत असताना प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, [[गोवा|गोव्यापर्यंतची]] [[सह्याद्री]]ची पर्वतराजी येथे ते झाडे बघत आणि त्यांचा अभ्यास करीत पायी फिरले होते. [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात त्यांनी दहा वर्षे [[वनस्पतिशास्त्र|वनस्पतिशास्त्राचे]] अध्यापन केले. त्यानंतर प्रा. [[शंकर पुरुषोत्तम आघारकर]] यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी तेथे डॉ. आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. वर्तक यांनी वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी १६ पीएच.डी. प्रबंधांसाठी मार्गदर्शन केले. |
||
==वनस्पती संग्रह== |
|||
जेथे वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात त्या जागेचे निरीक्षण करणे, त्या त्या वनस्पतींचे शास्त्रशुद्ध वर्णन करणे आणि त्यांची नावे ओळखणे हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी स्वत: गोळा केलेल्या वनस्पतींच्या १५००० नमुन्यांचा कागदावर चिकटवलेला संग्रह त्यांच्यापाशी होता. त्याशिवाय १२००० सुटे नमुने आणि बाटल्यातून साठवलेले १००० नमुने असा प्रचंड खजिना त्यांच्यापाशी होता. वनस्पती ओळखून त्याची नोंद केल्यावर प्रा. वर्तक त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म व इतर उपयोग, त्यांची पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासींची त्या औषधी वापरण्याची पद्धत या गोष्टींची साक्षेपाने नोंदी ठेवीत. |
|||
==देवराया== |
|||
भारतामध्ये मंदिरांभोवती शतकानुशतके जोपासलेल्या बागांना [[देवराई|देवराया]] म्हणतात. अशा [[देवराई|देवराया]] भारतात शेकडोंच्या संख्येने आहेत. तो वर्तकांच्या अभ्यासाचा खास विषय होता आणि त्या विषयावरर त्यांनी मराठी व इंग्रजीत ग्रंथ लिहिले आहेत. |
|||
==लेखन== |
|||
* गोमन्तकातील वनश्री (पुस्तक, १९६६) |
|||
* ताडामाडांची पामसृष्टी |
|||
* शंभरेक संशोधन प्रबंध (अनेक प्रबंधांचे सहलेखक [[माधव गाडगीळ]] किंवा नलिनी गुंजाटकर किंवा विनया घाटे किंवा [[हेमा साने]]) |
|||
* Focus on Sacred Groves & Ethnobotany (सहलेखक डॉ. विनया घाटे, २००४) |
|||
==सन्मान== |
|||
* डॉ. वा.द. वर्तकांच्या सन्मानार्थ दोन वनस्पतींना त्यांच्या नावे ओळखले जाते. |
|||
* पुण्यातील शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठी असलेल्या एका उद्यानाला वर्तक यांचे नाव दिले आहे. |
|||
==संदर्भ== |
|||
*[http://yenforblue.blogspot.in/2015/04/v-is-for-vartak-udyan.htmlवर्तक उद्यान] |
|||
[[वर्ग:मराठी शास्त्रज्ञ]] |
१४:१८, १७ जून २०१६ ची आवृत्ती
प्रा. डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, १७ एप्रिल, इ.स. २००१) हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते.
डॉ. वा..द.वर्तक यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्रीची पर्वतराजी येथे ते झाडे बघत आणि त्यांचा अभ्यास करीत पायी फिरले होते. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी दहा वर्षे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी तेथे डॉ. आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. वर्तक यांनी वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी १६ पीएच.डी. प्रबंधांसाठी मार्गदर्शन केले.
वनस्पती संग्रह
जेथे वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात त्या जागेचे निरीक्षण करणे, त्या त्या वनस्पतींचे शास्त्रशुद्ध वर्णन करणे आणि त्यांची नावे ओळखणे हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांनी स्वत: गोळा केलेल्या वनस्पतींच्या १५००० नमुन्यांचा कागदावर चिकटवलेला संग्रह त्यांच्यापाशी होता. त्याशिवाय १२००० सुटे नमुने आणि बाटल्यातून साठवलेले १००० नमुने असा प्रचंड खजिना त्यांच्यापाशी होता. वनस्पती ओळखून त्याची नोंद केल्यावर प्रा. वर्तक त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म व इतर उपयोग, त्यांची पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासींची त्या औषधी वापरण्याची पद्धत या गोष्टींची साक्षेपाने नोंदी ठेवीत.
देवराया
भारतामध्ये मंदिरांभोवती शतकानुशतके जोपासलेल्या बागांना देवराया म्हणतात. अशा देवराया भारतात शेकडोंच्या संख्येने आहेत. तो वर्तकांच्या अभ्यासाचा खास विषय होता आणि त्या विषयावरर त्यांनी मराठी व इंग्रजीत ग्रंथ लिहिले आहेत.
लेखन
- गोमन्तकातील वनश्री (पुस्तक, १९६६)
- ताडामाडांची पामसृष्टी
- शंभरेक संशोधन प्रबंध (अनेक प्रबंधांचे सहलेखक माधव गाडगीळ किंवा नलिनी गुंजाटकर किंवा विनया घाटे किंवा हेमा साने)
- Focus on Sacred Groves & Ethnobotany (सहलेखक डॉ. विनया घाटे, २००४)
सन्मान
- डॉ. वा.द. वर्तकांच्या सन्मानार्थ दोन वनस्पतींना त्यांच्या नावे ओळखले जाते.
- पुण्यातील शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठी असलेल्या एका उद्यानाला वर्तक यांचे नाव दिले आहे.