"संगीत पुण्यप्रभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:
गंधर्व कंपनीने 'संगीत पुण्यप्रभाव' हे नाटक घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी यांना गंधर्व कंपनीला तीन अटी घातल्या. त्या ऐकून कंपनी नाटक स्वीकारायला नकार दिला.
गंधर्व कंपनीने 'संगीत पुण्यप्रभाव' हे नाटक घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी यांना गंधर्व कंपनीला तीन अटी घातल्या. त्या ऐकून कंपनी नाटक स्वीकारायला नकार दिला.

===गडकर्‍यांनी घातलेल्या अटी===
१) नाटक पदांसहित लिहून झाल्यावर चार महिन्यांच्या मुदतीत तालमी घेऊन त्याचा प्रयोग केला जावा.. पदांच्या चाली गंधर्व कंपनीने द्याव्यात, पदे गडकरी लिहून देतील.

२) पात्रांची वाटणी गंधर्व कंपनीने करावी. पण कालिंदीचे काम करणारा नट गडकरी ठरवतील.

३) कंपनीने नाटकाच्या हक्काप्रीत्यर्थ गडकर्‍यांना ३००० रुपये द्यावेत.

ज्या काळात ‘[[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर|कोल्हटकर]] आणि [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर|खाडिलकर]] यांना २००० ते २५०० रुपये मिळत होते, त्या काळात गडकर्‍यांना ३००० रुपये कसे देणार’ या कारणास्तव बोलणी फिस्कटली आणि गंधर्व मंडळीने नाटक स्वीकारण्यास नकार दिला..

१५:५०, २ जून २०१६ ची आवृत्ती

'संगीत पुण्यप्रभाव' हे राम गणेश गडकरी यांचे स्वतःची पद्यरचना असलेले हे एकमेव पूर्ण नाटक आहे. हे नाटक १९१६च्या जून-जुलैच्या सुमारास रंगभूमीवर आले. पण त्याचे लेखन गडकऱ्यांनी १९१४च्या सुमारास सुरू केले होते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या पातिव्रत्याला व तिच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून 'पातिव्रत्य' हा विषय केंद्रीभूत ठेवून त्यांनी कथेची कल्पनारम्य उभारणी करून हे नाटक लिहावयास घेतले.

गडकरी नाटके नेहमी उलट्या क्रमाने लिहीत. 'पुण्यप्रभाव'चा सहाव्या अंकातील शेवटचा वृंदावन-वसुंधरेचा हार घालण्याचा अटीतटीचा प्रवेश प्रथम लिहून व सहावा अंक प्रथम लिहून, उरलेले अंक उलट्या क्रमाने लिहून व शेवटी पहिला अंक लिहून त्यांनी नाटक पूर्ण केले.

नाटक मंडळीत पुण्यप्रभाव

सन १९१३च्या सुमारास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीत काही कारणामुळे फाटाफूट होऊन टेंबे, बोडस व बालगंधर्व कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी समाईक भागिदारीची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केली. साहजिकच किर्लोस्कर नाटक मंडळीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कंपनीचे मालक शंकरराव मुजुमदार नव्या नाटकाच्या शोधात होते. गंधर्व नाटक मंडळीसुद्धा स्वतःच्या हक्काच्या नव्या नाटकाच्या शोधात होती.

दरम्यान राम गणेश गडकरी यांनी नवीन नाटक लिहावयास घेतल्याचे बोडसांना समजले. त्यांनी या नाटकाची मागणी गडकऱ्यांकडे केली. म्हणून गडकऱ्यांनी 'पुण्यप्रभाव'चा ६व्या अंकाचा शेवटचा प्रवेश वाचावयास दिला. तो वाचून बोडस खूश झाले. गंधर्व मंडळीत त्याचे वाचन करण्यास हस्तलिखित गडकऱ्यांच्या परवानगीने घेऊन गेले.

गडकर्‍यांची अटी आणि गंधर्व मंडळीचा नकार

गंधर्व कंपनीने 'संगीत पुण्यप्रभाव' हे नाटक घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी यांना गंधर्व कंपनीला तीन अटी घातल्या. त्या ऐकून कंपनी नाटक स्वीकारायला नकार दिला.

गडकर्‍यांनी घातलेल्या अटी

१) नाटक पदांसहित लिहून झाल्यावर चार महिन्यांच्या मुदतीत तालमी घेऊन त्याचा प्रयोग केला जावा.. पदांच्या चाली गंधर्व कंपनीने द्याव्यात, पदे गडकरी लिहून देतील.

२) पात्रांची वाटणी गंधर्व कंपनीने करावी. पण कालिंदीचे काम करणारा नट गडकरी ठरवतील.

३) कंपनीने नाटकाच्या हक्काप्रीत्यर्थ गडकर्‍यांना ३००० रुपये द्यावेत.

ज्या काळात ‘कोल्हटकर आणि खाडिलकर यांना २००० ते २५०० रुपये मिळत होते, त्या काळात गडकर्‍यांना ३००० रुपये कसे देणार’ या कारणास्तव बोलणी फिस्कटली आणि गंधर्व मंडळीने नाटक स्वीकारण्यास नकार दिला..