"वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:


== साहित्यातील चित्रण==
== साहित्यातील चित्रण==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात.ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी [[दशरथ यादव]] यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडीनिघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे.यादव यांनी दैनिक सकाळ साठी वारीचे वातार्तांकन केले होते.त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी [[दशरथ यादव]] यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक [[गजेंद्र अहिरे]] यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.


== नियोजन ==
== नियोजन ==

१६:०४, २७ मे २०१६ ची आवृत्ती

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी करणार्‍या व्यक्तीस वारकरी म्हणतात.

नाव

इतिहास

पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पान्दारीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.

मुख्य वा-या

प्रकार

वारीचे दोन प्रकार आहेत.

  • आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात आपापल्या गावाहून येतात.
  • कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.

साहित्यातील चित्रण

देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.

नियोजन

वारीसदृश इतर परंपरा

उत्तर भारतात शंकराचे भक्त सामुदायिकरीत्या कावडीने गंगेचे पाणी नेतात त्यांना कावडीये म्हणतात.

सन्दर्भ