"खडा पारशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी हा २००० फूट उंचीचा सुळका नाणेघाटापास... |
(काही फरक नाही)
|
०६:१७, २३ मे २०१६ ची आवृत्ती
वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी हा २००० फूट उंचीचा सुळका नाणेघाटापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आयताकार जीवधन गडाच्या टोकाला आहे. हिमालयाची चढाई करण्याची पूर्वतयारी म्हणून अनेक मराठी गिर्यारोहक खडा पारशी चढून जाण्याचा प्रयत्न करतात.
मुंबईतील खडा पारशी
मुंबईत भायखळा येथे असलेल्या दोन पुलांच्या बेचक्यात उभ्या राहिलेल्या व्यक्तीचा एक भव्य पुतळा आहे. ह्या पुतळ्याला स्थानिक लोक खडा पारशी म्हणतात.
मुंबई शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या अनेक वास्तू आहेत त्यांपैकी एक प्रमुख व प्रसिद्ध वास्तू म्हणजे हा खडा पारशी. पारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला हा पुतळा भायखळ्याची ओळख आहे. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेट करसेटजी माणोकजी यांच्या स्मरणार्थ बेलासिस रोड, क्लेअर रोड, डंकन रोड आणि रिपन रोड या जंक्शनवर १८७५ मध्ये त्यांच्या मुलांनी हा पुतळा उभारला. हा पुुतळा बीड व ब्राँझ धातूपासून तयार केलेला आहे. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेला चौथर्यावर आकर्षक नक्षीकाम आहे.