खडा पारशी
वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी हा नाणेघाटापासून जवळ असलेल्या जीवधन गडाच्या टोकावरील २००० फूट उंचीचा सुळका आहे. हिमालयाची चढाई करण्याची पूर्वतयारी म्हणून अनेक गिर्यारोहक आयताकार असलेला खडा पारशी चढण्याचा प्रयत्न करतात.
मुंबईतील खडा पारशी
[संपादन]मुंबईत भायखळा येथे असलेल्या दोन पुलांच्या बेचक्यात उभ्या राहिलेल्या व्यक्तीचा एक भव्य पुतळा आहे. ह्या पुतळ्याला स्थानिक लोक खडा पारशी म्हणतात.
हा पुतळा मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक प्रमुख व प्रसिद्ध वास्तू म्हणजे समजला जातो. पारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला शेट करसेटजी माणेकजी यांचा पुतळा आहे. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेट करसेटजी माणोकजी यांच्या स्मरणार्थ बेलासिस रोड, क्लेअर रोड, डंकन रोड आणि रिपन रोड या जंक्शनवर १८७५ मध्ये त्यांच्या मुलांनी बीड व ब्रॉंझ धातूपासून तयार केलेला हा पुतळा उभारला. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेला चौथऱ्यावर आकर्षक नक्षीकाम आहे.