"रवी पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
इंडियन नॅशनल थिएटरने [[वि.वा. शिरवाडकर]] यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेंन्री’ करायचे. या नाटकानंतर [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या. |
इंडियन नॅशनल थिएटरने [[वि.वा. शिरवाडकर]] यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेंन्री’ करायचे. या नाटकानंतर [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या. |
||
==रवी पटवर्धन यांची नाटके आणि (त्यांतील त्यांची भूमिका)== |
|||
* आनंद (बाबू मोशाय) |
|||
* आरण्यक (धृतराष्ट्र) |
|||
* एकच प्याला (सुधाकर) |
|||
* कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान) |
|||
* कोंडी (मेयर) |
|||
* कौंतेय |
|||
* जबरदस्त (पोलीस कमिशनर) |
|||
* तुघलक (बर्नी) |
|||
* तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू) |
|||
* पूर्ण सत्य |
|||
* प्रेमकहाणी (मुकुंदा) |
|||
* बेकेट (बेकेट) |
|||
* मला काही सांगायचंय (बाप्पाजी) |
|||
* मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस) |
|||
* विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर) |
|||
* विषवृक्षाची छाया (गुरुनाथ) |
|||
* वीज म्हणाली धरतीला |
|||
* शापित (रिटायर्ड कर्नल) |
|||
* सहा रंगांचे धनुष्य (शेख) |
|||
* सुंदर मी होणार (महाराज) |
|||
* स्वगत (जे.पी.) |
|||
* हृदयस्वामिनी (मुकुंद) |
|||
१६:३९, १८ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रवी पटवर्धन | |
---|---|
जन्म | रवी पटवर्धन |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
रवी पटवर्धन हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बँकेत नोकरी करत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
कथा कुणाची व्यथा कुणाला
१९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात पटवर्धन होते. रिझर्व्ह बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे प्रवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि हा प्रयोग झाला. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्याने ‘तुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का’, अशी विचारणा पगार यांनी केल्यावर बँकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. रवी पटवर्धन या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका करत होते.
अन्य नाटके
पुढे याच पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकातही रवी पटवर्धन यांनी काम केले.
१९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो.ग. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या.
इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेंन्री’ करायचे. या नाटकानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.
रवी पटवर्धन यांची नाटके आणि (त्यांतील त्यांची भूमिका)
- आनंद (बाबू मोशाय)
- आरण्यक (धृतराष्ट्र)
- एकच प्याला (सुधाकर)
- कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)
- कोंडी (मेयर)
- कौंतेय
- जबरदस्त (पोलीस कमिशनर)
- तुघलक (बर्नी)
- तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू)
- पूर्ण सत्य
- प्रेमकहाणी (मुकुंदा)
- बेकेट (बेकेट)
- मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
- मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
- विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)
- विषवृक्षाची छाया (गुरुनाथ)
- वीज म्हणाली धरतीला
- शापित (रिटायर्ड कर्नल)
- सहा रंगांचे धनुष्य (शेख)
- सुंदर मी होणार (महाराज)
- स्वगत (जे.पी.)
- हृदयस्वामिनी (मुकुंद)