"नानासाहेब सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म : नांदवली-रत्नागिरी ज... |
(काही फरक नाही)
|
१३:४८, १२ मे २०१६ ची आवृत्ती
नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म : नांदवली-रत्नागिरी जिल्हा, ११ फेब्रुवारी, इ.स. १९९६; मृत्यू : पुणे, २३ एप्रिल, इ.स. १९४०) हे एक मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ गणपतराव जोशी यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले.
पुढे नानासाहेबांनी आर्यन फिल्म कंपनी काढली. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅरिस्टर बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.
नानासाहेब सरपोतदार यांचे पटकथालेखन असलेले चित्रपट
- कल्याण खजिना
- दामाजी
- महाराची पोर (लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती)
- वत्सलाहरण
- शहाला शह
- सती सावित्री
- सिंहगड
- सैरंध्री (पहिला चित्रपट)
नानासाहेब सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेले चित्रपट
- चंद्रराव मोरे
- प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन)
- रक्ताचा सूड
- रायगडचे पतन
(अपूर्ण)