"लछमन हर्दवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा. लछमन परसराम हर्दवाणी हे सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये... |
(काही फरक नाही)
|
१५:५५, ७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
प्रा. लछमन परसराम हर्दवाणी हे सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये लिहिणारे लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ आहेत.
सिंध प्रांतात जन्माला आलेले प्रा. हर्दवाणी हे भारताच्या फाळणीनंतर आई-वडिलांबरोबर मजल दरमजल करीत पुण्याला आले. पुण्यातून एम.ए. केल्यानंतर ते अहमदनगरच्या महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक झाले. मातृभाषा सिंधीची साथ न सोडता त्यांनी हिंदीचे अध्यापन आणि त्याच वेळी मराठी-सिंधीची सेवा चालू ठेवली. प्रा. हर्दवाणींनी ज्ञानेश्वरी, दासबोध अशा मराठीतील अक्षरवाङ्मयाचे सिंधी भाषेत रसाळ भाषांतर केले.
प्रा. हर्दवाणी यांची सिंधी, मराठी व हिंदी या भाषांत आजपर्यंत ९० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मतानुसार, संस्कृतपासून निघालेल्या सिंधी भाषेची मूळ-स्वाभाविक लिपी देवनागरीच आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात तिची लिपी अरेबिकमध्ये कृत्रिमरीत्या करण्यात आली होती. हर्दवाणी यांनी गेल्या चाळीस वर्षांत आपली बहुतेक पुस्तके देवनागरी लिपीत मुद्रित करून स्व-खर्चाने प्रकाशित केली आहेत.
सिंधी, मराठी, हिंदी भाषेतील त्यांची पुस्तके त्यांनी अनेकांना भेट देऊन आपण फक्त सिंधी व्यापारी नाही हेदाखवून दिले आहे.
प्रा.लछ्मन परसराम हर्दवाणी यांची पुस्तके
- चला सिंधी शिकू या (मराठी माणसांना सिंधी भाषा शिकण्यासाठीचे पुस्तक). या पुस्तकाचे प्रकाशन(इ.स.२०१३) हर्दवाणी यांनी स्वतःच केले आहे. या पुस्तकात सिंधी आणि मराठी भाषेतील साम्यस्थळे आणि दोन्ही भाषेतील समान अर्थाचे आणि समान उच्चाराचे किमान ५००० शब्द दिलेले आहेत.
- जर्मन-मराठी-सिंधी शब्दकोश (सहलेखक - अविनाश बिनीवाले)
- तुकारामाची अभंगगाथा (सिंधी भाषांतर)
- दासबोध (सिंधी भाषांतर)
- मनाचे श्लोक (सिंधी भाषांतर)
- मराठी-सिंधी शब्दकोश (हा महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९९२साली प्रकाशित केला आहे.)
- सिंधी-मराठी शब्दकोश (१९९२)
- सिंधी लघुकथा (मराठी भाषांतर)
- ज्ञानेश्वरी (सिंधी भाषांतर)
पुरस्कार
प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांना दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद’ या संस्थेतर्फे ‘साहित्य सन्मान’ व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी इंदूर येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कारवितरण झाले.