अविनाश बिनीवाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अविनाश बिनीवाले
जन्म १२ मार्च, १९४३ (1943-03-12) (वय: ८१)
ख्याती भाषाभ्यासक, भाषाशिक्षक, कोशकार, लेखक
पुरस्कार

 •  कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार (२००१),
 •  हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०१४),

 • डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक' पुरस्कार (२०१७)


डॉ. अविनाश बिनीवाले (जन्म १२ मार्च १९४३) हे भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक आहेत. त्यांनी भाषा, भाषाव्यवहार इत्यादी विषयांवर मराठीतून लेखन केले आहे. मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशनिर्मितीच्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना मुंबई विद्यापीठाने डी. लिट् पदवीने सन्मानित केले आहे.[१]

शिक्षण[संपादन]

डॉ. अविनाश बिनीवाले यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय येथून जर्मनसंस्कृत ह्या विषयांत बी.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परदेशी-भाषा-विभागातून जर्मन आणि भाषाविज्ञान ह्या विषयांत एम.ए.पदवी प्राप्त केली. याखेरीज त्यांनी हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरेन लॅंग्वेजेस येथून परदेशी भाषा म्हणून जर्मनचे अध्यापन या विषयातली पदविका प्राप्त केली आहे. "मराठी-डॉइच् शब्दकोश" ह्या शब्दकोशाच्या निर्मितीसाठी मार्च २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाची डी. लिट् (D. Litt.) ही सर्वोच्च पदवी डॉ. अविनाश बिनीवाले यांनी मिळवली.[ संदर्भ हवा ] ह्या पहिल्याच कोशाचे काम सुमारे ४० वर्षे चालू होते.

अध्यापनाचा अनुभव[संपादन]

१९६३ सालापासून जर्मन भाषा आणि साहित्य या विषयाचे अध्यापन केले. डॉ. अविनाश बिनीवाले यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात जर्मन भाषेचे अध्यापन केले आणि ह्याच महाविद्यालयातून जर्मन-विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले.[ संदर्भ हवा ]

पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयाचे अध्यापन त्यांनी केले. उद्योगक्षेत्रात भाषांतरकार/दुभाषी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले. १९६७ मध्ये महाराष्ट्र शिक्षणसेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या रशियन भाषा पदविका अभ्यासक्रमाचे ७ वर्षे त्यांनी अध्यापन केले.[ संदर्भ हवा ]

मुंबई विद्यापीठाद्वारे अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. परदेशातील विशेषतः फ्रेंच तसेच जर्मन विद्यार्थी/अभ्यासक ह्यांना हिंदी शिकवण्याचे काम ते करतात.[ संदर्भ हवा ]

सन १९८० आणि १९८९ मध्ये जर्मनीतील ग्यॉटिङनच्या ग्योटऽ इन्स्टिटूट्मध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]

भाषा अभ्यास[संपादन]

मराठीच्या जोडीने संस्कृत, हिन्दी, गुजराती, बंगाली, सिन्धी, असमीया ह्या भारतीय भाषा डॉ. बिनीवाले यांना अवगत आहेत. याजोडीने जर्मन, फ्रेंच, रशियन, इंग्रजी या भाषांचा त्यांचा अभ्यास आहे.[२]

भाषाविषयक पुस्तके[२][संपादन]

अ.क्र. ग्रंथनाव प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. भाषा - आपली सर्वांचीच राज्य मराठी विकास संस्था मुंबई २०००
२. भाषाकारण मुद्रा प्रकाशन विरार २००२
३. बोलु कवतिकें राजहंस प्रकाशन पुणे २००५
४. माय मरो पण ... राजहंस प्रकाशन पुणे २००५
५. शब्दगन्ध गौतमी प्रकाशन नाशिक २००७
६. भाषा घडतांना गौतमी प्रकाशन नाशिक २००७
७. भाकरीची भाषा डायमण्ड पब्लिकेशन पुणे २००९
८. परिसस्पर्श डायमण्ड पब्लिकेशन पुणे २००९
९. आवडतं व्याकरण अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर २०१५
१०. ओऽडर् ते राइन् अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर २०१५
११. भाषा - आपली सर्वांचीच राज्य मराठी विकास संस्था मुंबई २०२०
२०. भाषासौष्ठव महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई २०२४
२१ वतन (कथासंग्रह) प्रोफिशन्ट पब्लिशिंग हाऊस पुणे २०२४

भाषा शिक्षणासाठी लिहिलेली पुस्तके[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. जर्मन भाषा परिचय फडके प्रकाशन कोल्हापूर १९८३
२. जर्मन शिकू या स्नेहल प्रकाशन पुणे १९९५
३. जर्मन शिका अनमोल प्रकाशन पुणे प्रथमावृत्ति जुलै २०००,

द्वितीयावृत्ति डिसेंबर २०००, तृतीयावृत्ति २००१, सुधारित चतुर्थावृत्ति २००३

४. जर्मन शिका नितीन प्रकाशन पुणे पञ्चमावृत्ति २००६,

षष्ठावृत्ति २००९

५. झटपट जर्मन नितीन प्रकाशन पुणे २००४
६. जर्मनचा श्रीगणेशा गौतमी प्रकाशन नाशिक २००४
७. जर्मनचा श्रीगणेशा विराज प्रकाशन मुंबई २००४
८. जर्मन शिका (सुधारित) नितीन प्रकाशन पुणे २००९
९. जर्मन संभाषण वसुधा प्रकाशन नाशिक २०१३
१०. Model Handbook to Lernziel Deutsch (Oxford University Press) नवी दिल्ली २०००
११. जर्मन सीखिए (हिन्दी) अनमोल प्रकाशन पुणे २००२
१२. जर्मन शीखो (गुजराती) प्रवीण प्रकाशन राजकोट २००३
१३. German - Let’s learn it! व्हिजन पब्लिकेशन पुणे २००६
१४. ABC of German करिअर पब्लिकेशन नाशिक २००७
१५. जर्मन भाषा का श्रीगणेश (हिन्दी) नितीन प्रकाशन पुणे २००८
१६. जर्मन भाषा (असमीया) असम बुक हाइव् गुवाहाटी २०१४
१७. फ्रेंच भाषेचा श्रीगणेशा मुद्रा प्रकाशन विरार २००५
१८. ABC of French करिअर पब्लिकेशन नाशिक २००७
१९. फ्रांसिसी भाषा का श्रीगणेश (हिन्दी) नितीन प्रकाशन पुणे २००८
२०. फ्रेंच सम्भाषण वसुधा प्रकाशन नाशिक २०१४

कोशसाहित्य[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. मराठी-जर्मन व्यवहारोपयोगी शब्दकोश नितीन प्रकाशन पुणे १९९८
२. सुलभ हिन्दी-मराठी कोश के. भि. ढवळे प्रकाशन मुंबई २००१
३. डॉइच्-मराठी-इंग्लिश शब्दकोश व्हिजन प्रकाशन पुणे २००६
४. मराठी-जर्मन व्यवहारोपयोगी शब्दकोश

(सुधारित व विस्तारित आवृत्ती)

नितीन प्रकाशन पुणे २००६
५. मराठी-डॉइच् शब्दकोश साहित्य संस्कृति मण्डळ मुंबई २०१२
६. जर्मन-मराठी भाषांतर शब्दकोश वसुधा प्रकाशन नाशिक २०१४
७. जर्मन-मराठी/सिन्धी शब्दकोश सिन्धु प्रकाशन पुणे २०१४

भाषांतरे[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. माता धीराई (बर्टोल्ट् ब्रेश्ट् ह्यांच्या नाटकाचा मूळ जर्मनमधून मराठी[३] अनुवाद) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९८३
२. प्रोफेसर माम्लोक् (फ्रीडरिश् वोल्फ् ह्यांच्या नाटकाचा मूळ जर्मनमधून मराठी अनुवाद) साहित्य संस्कृति मण्डळ मुंबई १९८६
३. काकांचे स्वप्न (दस्तयेवस्कि ह्यांच्या कादंबरीचा[४] मूळ रशियनमधून मराठी अनुवाद) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९८७
४. मुकाम पोस्ट देवाचे गोठणे (मराठीतून हिन्दी अनुवाद) राज्य मराठी विकास संस्था मुंबई २००१
५. नर्मदे हर! हर नर्मदे! (मूळ मराठी भाषेत असलेल्या सुहास भास्कर लिमये ह्यांच्या पुस्तकाचा हिन्दी अनुवाद) गोण्डी पब्लिक ट्रस्ट प्रकाशन मण्डला (मध्यप्रदेश) २०११
६. यज्ञरहस्य (मराठीतून हिन्दी अनुवाद) यज्ञेश्वर प्रकाशन बदलापूर २०११
७. (अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र (मराठीतून हिन्दी अनुवाद) यज्ञेश्वर प्रकाशन बदलापूर २०११
८. काकांचे स्वप्न (दस्तयेवस्कि ह्यांच्या कादंबरीचा[४] मूळ रशियनमधून मराठी अनुवाद, सुधारित आवृत्ति) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे २०१३
९. मेनोपोज़ (मराठीतून हिन्दी अनुवाद) ज्ञाननयन प्रकाशन पुणे २०१३
१०. माता धीराई (बर्टोल्ट् ब्रेश्ट् ह्यांच्या नाटकाचा मूळ जर्मनमधून मराठी[३] अनुवाद, सुधारित आवृत्ति) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे २०१५
११. कारारबाईंची शस्त्रं (फ्रीडरिश् वोल्फ् ह्यांच्या नाटकाचा मूळ जर्मनमधून मराठी अनुवाद) पण्डित पब्लिकेशन कणकवली २०२०

ललित साहित्य (कादंबरी)[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. जय कैलास! जय मानस! वेद प्रकाशन पुणे १९८६
२. कैलास मानस कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे २०१२
३. जय कैलाश (हिन्दी उपन्यास) जागृति साहित्य प्रकाशन पटना २०१२
४. कैलास मानस (सुधारित आवृत्ति) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे २०१६
५. बोमदिला (मराठी कादम्बरी, सङ्क्षिप्त) कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९९५
६. बोमदिला (हिन्दी उपन्यास, सङ्क्षिप्त) श्रीविद्या प्रकाशन दिल्ली १९९६
७. बोमदिला (सङ्क्षिप्त, मराठीतून कन्नड अनुवाद, अनुवादक -रश्मी शिरहट्टी) अवनि प्रकाशन धारवाड २००७
८. बोमदिला (सम्पूर्ण, हिन्दीतून असमीया अनुवाद, अनुवादक - पुष्पधर शर्मा) प्रोक्रिएट प्रकाशन उदालगुरि (असम) २०१०
९. बोमदिला (हिन्दीतून संस्कृत अनुवाद, अनुवादक - दत्तभूषण पोलकम) संस्कृतभारती प्रकाशन नवी दिल्ली २०११
१०. बोमदिला (हिन्दी उपन्यास) जागृति साहित्य प्रकाशन पटना २०११
११. बोमदिला १९६२ (हिन्दीतून गुजराती अनुवाद, अनुवादक - प्रतिभा दवे) अरुणोदय प्रकाशन अहमदाबाद २०१३
१२. बोमदिला (हिन्दीतून बोडो अनुवाद, अनुवादक - दिनेश सिंग ब्रह्म) थुनलाइ प्रकाशन बरमा (असम) २०२२
१३. Bomdila (इंग्रजी) सिन्धु प्रकाशन पुणे २०२३
१४. बोमदिला १९६२ (हिन्दी उपन्यास, सम्पूर्ण) पुस्तकनामा गाज़ियाबाद २०२४

बोमदिला[संपादन]

१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या काळात नेफा भागातल्या सेला-बोमदिला खिण्डीत आपल्या सेनेचा दारुण पराभव झाला होता. त्या वेळच्या प्रत्यक्ष युद्धावरची जागतिक साहित्यातली ही एकमेव कादम्बरी आहे. बुमला-सेला-बोमदिला ते थेट तेज़पुरपर्यन्तचे युद्ध, त्यात भारतीय सैन्याची वाताहात, स्थानिकांचे दुहेरी वर्तन, चिनी नि भारतीय गुप्तहेर अशा अनेक घटनांनी भरलेल्या युद्धाचे प्रत्ययकारी वर्णन म्हणजे "बोमदिला" कादम्बरी. शेकडो सेनाधिकाऱ्यांनी वाखाणलेली, डॉ. इन्दिरा गोस्वामी, डॉ. भैरप्पा, डॉ. शान्तिनाथ देसाई इत्यादी साहित्यिकांनी गौरवलेली ही कादम्बरी कोणत्याही सरकारी/निमसरकारी/बिनसरकारी संस्थेच्या कसल्याही मदतीशिवाय आत्तापर्यन्त हिन्दी, मराठी, कन्नड, असमीया, संस्कृत, गुजराती, बोडो एवढ्या भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे.[ संदर्भ हवा ] डॉ. बिनीवाल्यांनी ही कादम्बरी मुळात हिन्दीत लिहिली आहे.

प्रवासवर्णन/संस्कृति[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रंथनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. गरुडांच्या देशात माधुरी प्रकाशन पुणे १९८८
२. संस्कृति - जर्मन भाषिकांची डायमण्ड पब्लिकेशन पुणे २००६
३. पूर्वांचल कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे २००८
४. जर्मन भाषेतील साहित्य गायत्री प्रकाशन पुणे २००९
५. न्याहारी अक्षरदालन प्रकाशन कोल्हापुर २०१२
६. गरुडगळ नाडिनल्लि (गरुडांच्या देशात ह्या पुस्तकाचा कन्नड अनुवाद, अनुवादक - विरूपाक्ष कुलकर्णी) ऱ्यॉन्टगन प्रकाशन पुणे २०२३
७. ईरान पारश्यांचे तीर्थक्षेत्र सिन्धु प्रकाशन पुणे प्रथमावृत्ति जानेवरी २०२३,

द्वितीयावृत्ति एप्रिल २०२३

८. ईरान पारसियों का तीर्थक्षेत्र (मराठीतून हिन्दी अनुवाद, अनुवादिक - ज्योति झा) पुस्तकनामा गाज़ियाबाद २०२४

वैचारिक पुस्तके[ संदर्भ हवा ][संपादन]

अ.क्र. ग्रन्थनाम प्रकाशक स्थळ प्रकाशनवर्ष
१. आतंकवाद में झुलसता पूर्वांचल सुनिल प्रकाशन मुंबई १९९९
२. जननायक (अटलजींचे चित्रमय हिन्दी चरित्र) वेद प्रकाशन पुणे २००२
३. पूर्वांचल - आह्वान तथा आवाहन (मराठीतून हिन्दी अनुवाद) लोकहित प्रकाशन लखनऊ २००४
४. आजचा अरुणाचल प्रदेश[५] अक्षरदालन प्रकाशन कोल्हापुर २०१६

पुरस्कार[ संदर्भ हवा ][संपादन]

१. 'भाषा - आपली सर्वांचीच' ह्या पुस्तकासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार (२००१)

२. 'जय कैलाश' ह्या कादम्बरीसाठी हिन्दी साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०१४)

३. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे 'डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार' (२७.२.२०१८)[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Mumbai University to confer D Litt on Avinash Biniwale who created German-Marathi dictionary". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ a b "अविनाश बिनीवाले". Maharashtra Times. 2020-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ a b बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'मदर करेज' या जर्मन नाटकाचा अनुवाद
  4. ^ a b अंकल्स ड्रीम ह्या कादंबरीची ओपन लायब्ररीतील नोंद
  5. ^ हिमानी चौकर या लेखिका आहेत. अविनाश बिनीवाले साहाय्यक आहेत
  6. ^ मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन