Jump to content

"पृथ्वीगीर हरिगीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; मृत्यू : १४मार...
(काही फरक नाही)

१२:३४, १६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी (जन्म : यवतमाळ, इ.स. १८७६; मृत्यू : १४मार्च, इ.स. १९३१) हे एक मराठी पत्रकार, ज्ञाति-इतिहास संशोधक आणि लेखक-संपादक होते. ते पृथ्वीगीर हरिगीर या नावाने लिखाण करीत असत.

पृथ्वीगीर हरिगीर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ‘हरिकिशोर’ या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या सहकार्‍यांच्या लिखाणामुळे ब्रिटिश आमदानीत त्यांच्यावर खटला भरला गेला, आणि त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली.

पृथ्वीगीर हरिगीर यांनी लिहिलेला संशोधनात्मक ग्रंथ

गोसावी व त्याचा संप्रदाय भाग १ (इ.स. १९२६) आणि भाग २ (इ.स. १९३१) : गोसावी संप्रदाय हा शूद्रवर्णी असल्याची चुकीची माहिती सरकारी दप्तरांत होती. वेद-उपनिषदांच्या साहाय्याने गोसावी हा ब्राह्मण वर्गातील संप्रदाय असल्याचे पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी या ग्रंथातून सप्रमाण सिद्ध केले. ऐतिहासिक आणि तत्कालीन कर्तृत्ववान गोसाव्यांच्या घराण्यांचा परामर्शही त्यांनी हा ग्रंथात घेतला आहे.