Jump to content

"सु.ल. गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंडच्या समाजजीवनाचे एक अभि...
(काही फरक नाही)

१७:१२, २७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

सुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंडच्या समाजजीवनाचे एक अभिन्‍न अंग होते. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरणरे ते एक प्रतिभावंत होते.

गद्रेे कुटुंबीय मूळचे सांगलीचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. सु.ल. गद्रे यांनी वालचंद कॉलेज मधून १९५४मध्ये बी. ई. (सिव्हिल) ची पदवी घेतली. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या रस्ते विभागात आणि नंतर मुंबई महापालिकेच्या नोकरीत दाखल झाले. काही वर्षांनी ती नोकरी सोडून त्यांनी मुलुंडमध्ये स्वतंत्र व्यवसायास प्रारंभ केला. अल्पावधीत त्यांनी आकिर्टेक्ट, इंजिनिअर आणि बिल्डर म्हणून जम बसविला. मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर घरबांधणी केली.

सामाजिक कार्य

व्यवसायात यशाची भरारी घेत असतानाच सु.ल. वैद्य यांनी मुलुंडमधील विद्या झंकार, मुलुंड जिमखाना, रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकूर शिक्षणसंस्था, महाराष्ट्र सेवा संघ अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये काम केले. या संस्थांमध्ये विविध पदे भूषवित असतानाच त्यांनी त्यांना नियमितपणे आर्थिक मदतही केली. विशेषत: महाराष्ट्र सेवा संघाचे आजचे स्थान घडविण्यात आणि मुलुंडच्या सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घालण्याचे त्यांचे कार्य मोठे आहे.

अपना बाजार, युनायटेड वेस्टर्न बँक यासारख्या भक्कम अनामत ठेवी आगाऊ देणारे भाडेकरू गद्रेे यांनी मिळवले आणि त्यातूनच महाराष्ट्र सेवा संघाची वीस हजार चौरस फुटांची वास्तू उभी राहिली.

पुरस्कारांची योजना

महाराष्ट्र सेवा संस्थेस आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणून इमारतीतील मोठा हॉल लग्न समारंभांसाठी दिला जाऊ लागला. इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून गद्रेे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार देऊ केले. २००८ साली त्यांनी पुढील दहा वर्षांसाठीची पुरस्काराची नवीन योजना जाहीर केली होती.

रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांना मार्च २०१५ मध्ये मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार २०१० साली दिलीप प्रभावळकर यांना, २०११ साली गायिका वीणा सहस्रबुद्धे यांना व २०१२ साली शेषराव मोरेे यांना मिळाला होता. शांता शेळके याही या पुरस्काराच्या धनी झाल्या होत्या.

निधन

आयुष्यातली शेवटची वर्षे गद्रे यांनी पुण्यात काढली. तेथेही त्यांनी साहित्य आणि कलाविश्वाशी स्वतःला जोडून घेतले, व ते त्यांना आर्थिक मदतीचा हात देत राहिले. वयाच्या ७६व्या वर्षी, नोव्हेंबर २००८मध्ये त्यांचे निधन झाले