"जहानआरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Jahanara 1635.jpg]]

'''जहानआरा''' ([[२ एप्रिल]], [[इ.स. १६१४]] - [[१६ सप्टेंबर]], [[इ.स. १६८१]]) ही मोगल बादशहा [[शाहजहान]] व [[मुमताज महल]] यांची मुलगी व [[औरंगजेब|औरंगजेबाची]] थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.
'''जहानआरा''' ([[२ एप्रिल]], [[इ.स. १६१४]] - [[१६ सप्टेंबर]], [[इ.स. १६८१]]) ही मोगल बादशहा [[शाहजहान]] व [[मुमताज महल]] यांची मुलगी व [[औरंगजेब|औरंगजेबाची]] थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.



१३:५७, १० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

                                                                                                                                                                                                                                                                         

जहानआरा (२ एप्रिल, इ.स. १६१४ - १६ सप्टेंबर, इ.स. १६८१) ही मोगल बादशहा शाहजहानमुमताज महल यांची मुलगी व औरंगजेबाची थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.

औरंगजेब व तिचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. तिचा जीव दाराशुकोहवर जास्त होता. शाहाजहाननंतर तो मोगल साम्राज्याचा वारस बनावा, यासाठी तिचा प्रयत्‍न होता; पण औरंगजेबाने दाराशुकोहचा काटा काढला आणि मोगल बादशहा बनण्याचा मार्ग मोकळा केला.

जहानआराने आयुष्यात अनेक दुःखे भोगली. जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले; पण मोगल साम्राज्यासाठी ती कायम कणखर राहिली. प्रियकराविषयी तिच्या मनातील भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत.

मोगल राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच ती अविवाहित राहिली.

जहान‍आरा बेगमविषयी पुस्तके आणि दृश्यमाध्यमे

  • जहानआराची ही कहाणी आन्द्रिया वुतेनशोएन या पाश्चात्य लेखिकेने कादंबरीरूपात लिहिली आहे. तिचे ’जहानआरा बेगम - कहाणी मुघल शाहजादीची’ या नावाचे मराठी रूपांतर सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे. शाहजादी जहानआराची घुसमट, तडफड, वेदना असहाय्यता व उत्कट प्रेमभावना या कादंबरीतून व्यक्त होते.
  • पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर ’हम सितारे’ या कार्यक्रमात जहान-आरा-बेगम ही दैनंदिन मालिका येत असे. हिचे १००हून अधिक एपिसोड झाले होते.
  • जहान आरा (हिंदी चित्रपट, १९६४, नायिका माला सिन्हा)
  • ताजमहाल : अॅन इटर्नल लव्ह स्टोरी (हिंदी चित्रपट, २००५, नायिका मनीषा कोईराला)
  • An Omen for a Princess (इंग्रजी कादंबरी, लेखिका - जीन बॉथवेल)
  • Beneath a Marble Sky, (इंग्रजी कादंबरी, लेखक - जॉन शॉर्स)
  • Jahanara: Princess of Princesses, India - 1627 : The Royal Diaries या ग्रंथ मालिकेतले एक इंग्रजी पुस्तक, लेखिका - कॅथरीन लास्की.
  • Shadow Princess (इंदू सुंदरेशन यांची इंग्रजी कादंबरी - २०१०)