"बालनाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४: | ओळ ४: | ||
==सोलापूरचे बालनाट्य संमेलन== |
==सोलापूरचे बालनाट्य संमेलन== |
||
अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेची सोलापूर शाखा नोव्हेंबर २०१५ मध्ये एक बालनाट्य संमेलन आयोजित करणार आहे. ते |
अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेची सोलापूर शाखा नोव्हेंबर २०१५ मध्ये एक बालनाट्य संमेलन आयोजित करणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा [[कांचन सोनटक्के]] असतील. ते पहिलेच अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन असल्याचे सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात पहिले बालनाट्य संमेलन पुण्यात ३-४ मे २०१४ या काळात झाले होते. |
||
१४:४४, २७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे ३ व ४ मे २०१४ रोजी पुण्यात बालनाट्य संमेलन झाले.. त्यात राज्य व राज्याबाहेरील पन्नासहून अधिक संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी व बालकलाकार सहभागी झाले होते. प्रकाश पारखी हे संमेलनाचे निमंत्रक होते.
साने गुरुजी स्मारक इथे झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्य समीक्षक माधव वझे यांचे बालरंगभूमीची वाटचाल या विषयावर व्याख्यान झाले.. ४ मे रोजी सायंकाळी चार वाजता समारोपासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, बालकलाकार तेजश्री वालावलकर उपस्थित होते.. दोन्ही दिवस बालनाट्यांचे प्रयोग, ग्रिप्स रंगभूमीवरील नाटक, रंजक खेळ, परिसंवाद, मुलांशी चर्चा, असे उपक्रम यात समाविष्ट केलेले होते.
सोलापूरचे बालनाट्य संमेलन
अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेची सोलापूर शाखा नोव्हेंबर २०१५ मध्ये एक बालनाट्य संमेलन आयोजित करणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के असतील. ते पहिलेच अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन असल्याचे सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात पहिले बालनाट्य संमेलन पुण्यात ३-४ मे २०१४ या काळात झाले होते.
पहा : साहित्य संमेलने