"चुन्याचा मारुती (शहापूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कर्हाड-मसूर रस्त्यावर कर्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतराव... |
(काही फरक नाही)
|
१९:०७, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
कर्हाड-मसूर रस्त्यावर कर्हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनार्यावर स्थापिलेली ही मूर्ती आहे मूर्ती जवळपास ६ फूट उंच असून ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
शहापूरचे बाजीपंत कुलकर्णी यांची पत्नी सईबाई हिची निष्ठा पाहून समर्थांनी त्यांना शके १५६७ मध्ये शहापूर येथे चुन्याचा मारुती स्थापून दिला. हा मारुती रामदास स्वामींच्या अकरा मारुतींपैकी एक आहे.