Jump to content

"पंढरीनाथ कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (जन्म : १६ फेब्रुवारी, १९३०; म...
(काही फरक नाही)

२३:०८, १७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (जन्म : १६ फेब्रुवारी, १९३०; मृत्यू : मुंबई, १५ ऑगस्ट, २०१५) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.

पंढरीनाथ यांचेे वडील हे नामांकित गायक तर होतेच, पण पट्टीचे बीनवादकही होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बळवंत संगीत नाटक कंपनीचे भागीदार होते.

पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे संगीत शिक्षण

वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर.देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.

पंढरीनाथांच्या कन्या

शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या त्यांच्या तीन कन्या. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.

पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे ग्रंथलेखन

  • पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी भारतीय ख्याल गायकीचे मध्ययुगीन अध्वर्यू नियामतखान-सदारंग यांचे चरित्र लिहिले आहे.
  • गानयोगी शिवपुत्र (कुमार गंधर्वांवरचे पुस्तक)