Jump to content

"अवघा रंग एकचि झाला (संगीत नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि नाट्यसंपदा या संस्थेने रंगभ...
(काही फरक नाही)

१५:५६, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि नाट्यसंपदा या संस्थेने रंगभूमीवर आणलेले 'अवघा रंग एकचि झाला' हे एक संगीत नाटक आहे. ह्या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर असून दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे, तर रघुनंदन पणशीकर हे संगीत दिग्दर्शक आहेत. प्रसाद सावकार, जान्हवी पणशीकर आणि स्वरांगी मराठे यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

नाट्यसंपदा या संस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाचे १५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यरसिकांना दर्जेदार नाटके सादर करून आनंद देण्याची नाट्यसंपदाची परंपरा या नाटकानेही पुढे चालू ठेवली आहे.

नाटकाचे कथानक

अप्पा वेलणकर (प्रसाद सावकार) हे एक कीर्तनकार असून त्यांच्या कुटुंंबात घडणारे प्रसंग या नाटकात आहेत. आपल्या किर्तनावर, पारंपारिक रचनांवर प्रेम करणार्‍या अप्पांना नव्या पिढीचे विचार पटत नाहीत. त्यांची मुलगी मुक्ता हिला परजातीय तरुणाशी विवाह करायचा आहे. त्यांचा मोठा मुलगा ज्ञानेश अमेरिकेत आहे. नाटकात त्यांचा दुसरा मुलगा सोपान (अमोल बावडेकर) तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आपले जुने संगीत नवीन पद्धतीने जतन करायचे आहे. त्याला त्यात आजच्या पिढीचे बदलही करायचे आहेत. तोही अप्पांना आपले विचार पटवू शकत नाही.

आपल्या कीर्तनाच्या सीडी, कॅसेट्स तयार करण्यास अप्पा सोपानला नकार देतात. दोन पिढ्यांतील हे मतभेद नाटकात अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांत दिसतात. अमेरिकेहून जेनी नावाची मुलगी (स्वरांगी मराठे) या घरात येते. तिच्या येण्याने या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात आहे. तिला या घरातील मतभेद असह्य होतात. तिच्याच प्रयत्‍नाने अप्पा मुक्ताच्या विवाहास संमती देतात.

अप्पांची पत्‍नी (जान्हवी पणशीकर), अप्पांचे मित्र नाना (गौतम मुर्डेश्वर) ही नाटकातील अन्य पात्र आहेत. नाटकातील सर्व कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. प्रसाद सावकार यांनी अप्पांची व्यक्तिरेखा छानच साकारली आहे. अमोल बावडेकर यांनी सोपानची भूमिका प्रभावीपणे केली आहे. त्यांची गाणीही प्रेक्षकांना आवडतात. जेनी या अमेरिकन मुलीची या नाटकातली महत्त्वाची भूमिका स्वरांगी मराठे यांनी केली आहे. स्वरांगीने अमेरिकेहून आलेल्या मुलीचे उच्चार व अभिनय उत्तम साकारले आहेत. स्वरांगीचीही गाणी या नाटकात आहेत.