Jump to content

"जी.एन. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७९: ओळ ७९:


==जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक==
==जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक==
* स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र)
* स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र). या पुस्तकाचे Down Melody Lane नावाचे इंग्रजी भाषांतर Orient Longman या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.


==कॉम्पॅक्ट डिस्क्स==
==कॉम्पॅक्ट डिस्क्स==

१८:२६, २८ जुलै २०१५ ची आवृत्ती

जी.एन. जोशी
आयुष्य
जन्म ६ एप्रिल, इ.स. १९०९
जन्म स्थान भारत
मृत्यू सप्टेंबर २२, १९९४
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
नातेवाईक गायक अभिजित ताटके (नातू)
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

जी.एन. जोशी (जन्म : ६ एप्रिल, इ.स. १९०९; मृत्यू : सप्टेंबर २२, १९९४) हे मराठीतले आद्य भावगीत गायक होत. ’रानारानात गेली बाई शीळ’ हे त्यांचे आणि मराठीतले पहिले भावगीत.

जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्ही (हिज मास्टर्स व्हॉईस रेकॉर्ड कंपनी)मध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्याच, पण त्याप्र्क्षाही ते हूरहूर लावणार्‍या भावगीताच्या काळाचे खरे जनक म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत.

एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली.

एचएमव्हीत ४० वर्षे जी.एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे यांना दादा अधिकारी का म्हणत याचा अंदाज रसिकांना येईल.

पहिले भावगीत

‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.

इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफन खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते

जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक

  • स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र). या पुस्तकाचे Down Melody Lane नावाचे इंग्रजी भाषांतर Orient Longman या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

कॉम्पॅक्ट डिस्क्स

  • एचएमव्हीने जी.एन.जोशींच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ गाण्याच्या दोन सीडीज काढल्या आहेत, त्या सीडीजचेही नाव ’स्वरगंगेच्या तीरी’ असे आहे.

जी.एन. जोशी यांच्यावरील माहितीपट

  • स्वरगंगेचा साधक (माहितीपट)

बाह्य दुवे