"संभाजी भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==संभाजी भगत यांना मिळालेले पुरस्कार== |
==संभाजी भगत यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार== |
||
* आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणार्या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा [[प्रबोधनमित्र पुरस्कार]] (२०१४) |
* आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणार्या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा [[प्रबोधनमित्र पुरस्कार]] (२०१४) |
||
* अस्मितादर्श पुरस्कार |
* अस्मितादर्श पुरस्कार |
||
* संत तुकाराम पुरस्कार |
* संत तुकाराम पुरस्कार |
||
* मुंबईत भरलेल्या ५व्या [[राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद (२०१४) |
|||
[[वर्ग:मराठी कवी]] |
[[वर्ग:मराठी कवी]] |
१२:५८, १ जुलै २०१५ ची आवृत्ती
शाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहेत. त्यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. सुवर्णकमळ प्राप्त कोर्ट या चित्रपटातले एक गाणे त्यांनी गायले आहे.. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली.. त्या नाटकाची मूळ संकल्पना संभाजी भगत यांची होती. नाटकातली गीते व संगीत संभाजी भगत यांचेच आहे. या नाटकाला मिफ्टा अॅवॉर्ड मिळाले. त्यानंतर ’शिवाजी अंडरग्राउंड’ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली. या नाटकाचे कलाकार हे जालना जिल्ह्यातले शेतकरी आहेत.
संभाजी भगत यांनी एकाहून अधिक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजी भगत यांनी बरीच व्याख्याने दिली आहेत.
संभाजी भगत यांची पुस्तके
- अडगळ (नाटक)
- कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र)
संभाजी भगत यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
- आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणार्या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रबोधनमित्र पुरस्कार (२०१४)
- अस्मितादर्श पुरस्कार
- संत तुकाराम पुरस्कार
- मुंबईत भरलेल्या ५व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१४)