चर्चा:संभाजी भगत
इनकी सूरत को पहचानो भाई । इनसे संभल के रहना रे भाई।।
गलती करोगे, आहे भरोगे । जालिम का जमाना जहरिला भाई..।।
आपले खांद्यावर रूळणारे केस मागे उडवत डफ हातात घेऊन संभाजी गात असतो आणि समोर बसलेला जमाव त्या गाण्याचा एक भाग होऊन त्यात बुडून गेलेला असतो. शाहिराची अशी ताकद चालू काळात फक्त संभाजीच दाखवू शकतो. लोकशाहीर ही बिरुदावली आपल्या कपाळावर झुलणाऱ्या केसांप्रमाणे मिरवत संभाजी भगत गावोगाव फिरत असतो. त्याला मंचावर गाताना बघून नारायण सुवेर्, विजय तेंडुलकर यासारख्या बुजुर्गांना शाहीर अमरशेख आठवलेले आहेत तर अनेकांना तो गद्दरचा चेला वाटतो. तेलंगणाचा कडवा साम्यवादी शाहीर गद्दर एका टेचात मंचावर उभा राहून गात आणि नाचत असतो. त्याच्या शब्दांत अंगार असतो आणि गाण्याच्या लयीत लोकधून आरपार मुरलेली असते. ही वैशिष्ट्ये संभाजी भगतच्या गाण्यात आणि अदाकारीत सापडतात. मराठी मुलखातला गद्दरचा वारसदार असे त्याला कोणी म्हटले तर त्याला स्वत:ला ते आवडेल. कारण तोही तीच राजकीय विचारधारा मानतो आणि गद्दरप्रमाणे मातीशी इमान राखून कला सादर करतो. त्याने गद्दरची अनेक गाणी हिंदी आणि मराठीत अनुवादित केली आहेत. मुळचा पाचगणी जवळच्या महू गावातला संभाजी लहानपणापासूनच गावातल्या कुणबी आणि मातंग समाजातल्या कलावंतांची गायकी ऐकतच मोठा झाला. त्यांच्या भजनांवर आणि भारुडांवर त्याचा कलावंत पिंड पोसला गेला. पुढे तो मुंबईत आला आणि विद्याथीर् प्रगती संघटनेतून डाव्या चळवळीशी जोडला गेला तेव्हा त्याने आपले गावाकडचे कलासंचित इथल्या नव्या फॉर्ममध्ये परावतीर्त केले. आपल्या भोवतालचे वास्तव ठोक शब्दांत मांडत त्यातून विदोहाची ज्वाला फुलवण्यासाठी नवे, व्यवहारातले शब्द शोधले. भाषेची मोडतोड केली. धारावीत भरलेल्या पहिल्या विदोही साहित्य संमेलनात त्याने 'हे पालखीचे भोई, ह्यांना आईची ओळख नाही' हे गीत सादर केले तेव्हा सर्व वातावरणच भारल्यासारखे झाले. आव्हान नाट्य मंचतफेर् संभाजीने शाहीर विलास घोगरे यांच्याबरोबर अनेक पथनाट्ये सादर केली. शाहिरी कार्यक्रम केले. विलास घोगरे यांच्या मृत्यूनंतर 'आव्हान'ची जबाबदारीही सांभाळली. कलेतून सतत समकालिन वास्तवाला भिडत राजकीय भूमिका घेणारा शाहीर म्हणून त्याचे लोककलेतील स्थान वादातीत आहे. 'कातळाखालचे पाणी' हे आत्मकथन, 'तोड ही चाकोरी' हा गाण्यांचा संग्रह, 'रणहलगी' हा येऊ घातलेला लेखसंग्रह, 'उंदीर' नावाचे भारूड आणि 'गिरणीचा वग' हे मुक्तनाट्य अशी त्याची साहित्यसंपदा आहे. लोककला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी तो गावोगाव शाहिरांची शिबिरे घेत फिरतो आहे. म्हणूनच अमरावतीत होणाऱ्या लोककला-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्याची निवड अर्थपूर्ण आहे.
Start a discussion about संभाजी भगत
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve संभाजी भगत.