"देवानंद बाबूराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. देवानंद बाबूराव शिंदे यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्... |
(काही फरक नाही)
|
१४:२४, २३ जून २०१५ ची आवृत्ती
डॉ. देवानंद बाबूराव शिंदे यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. (जून २०१५)
देवानंद शिंदे ह्यांना पदवीच्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन-संशोधनासाठी मार्गदर्शन करण्याचा २५ वर्षांचा अनुभव आहे. ते बावीस वर्षे रसायनशास्त्र तंत्रज्ञान हा विषय शिकवत होते. वैद्यकीय रसायनशास्त्र, औषध रचनाशास्त्र आदी विषयांमध्येही शिंदे यांचा हातखंडा आहे. शिंदे यांनी विभागप्रमुख, परीक्षा मंडळ, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ, खरेदी समिती, संशोधन अधिमान्यता समिती, अभ्यास मंडळ अशा विविध जबाबदार्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सोळाहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली.
देवानंद शिंदे हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. स्वित्झर्लंडमधील व अमेरिकेतील संस्थांची त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. त्यांच्या नावावर तीन पेटंटे आहेत; तर ११० परिषदांमध्ये त्यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत.
शिंदे यांचे संशोधनाइतके साहित्यावरही तितकेच प्रेम आहे. चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ‘साहित्य निर्मितीत तंत्रज्ञानाचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला होता.