"विमल जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: विमल गजानन जोशी (जन्म : इ.स. १९३१; मृत्यू : १८ मे, २०१५) या एक नाट्यअभ... |
(काही फरक नाही)
|
२३:०३, १८ जून २०१५ ची आवृत्ती
विमल गजानन जोशी (जन्म : इ.स. १९३१; मृत्यू : १८ मे, २०१५) या एक नाट्यअभिनेत्री होत्या.
आकाशवाणीवरील 'कामगार सभा', 'वनिता मंडळ' या लोकप्रिय कार्यक्रमांमुळे विमलताईंचे नाव त्या काळात घरोघरी पोहोचले होते. त्यांच्या आवाजात मार्दव होते, आपलेपणाची लय होती. शब्दोच्चार स्वच्छ आणि अस्सल मराठी वळणाचे होते. त्यांच्याकडे परिश्रमाची तयारी, बुद्धिमत्ता, कणखर, मजबूत जीवननिष्ठा असल्याने आणि जगाकडे, परिस्थितीकडे तिरकसपणे पाहण्याच्चा त्यांचा स्वभाव असल्याने, विमल जोशींची एकूण निरीक्षणे मार्मिक आणि मजेशीर असत.
विमल जोशी यांनी आकाशवाणीवर ३५ वर्षे नोकरी करून, कामगार आणि स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमांतून अनेक कलावंतांनाही रेडिओवर येण्याची संधी मिळवून दिली.
हिंदीतील इप्टा थिएटरमधील नाटकांतूनही विमलताईंनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक दिग्गज कलावंतासोबत त्यांनी हिंदी नाटकांतून कामे केली होती. "चाकरमानी‘ या नाटकात त्यांनी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्या आईची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ, आणि डॉ. मीनल परांजपे या विमलताईंच्या कन्यका असून, अभिनेते अशोक सराफ आणि डॉ. सुनील परांजपे हे जावई आहेत.
विमल जोशी याची भूमिका असलेली मराठी नाटके
- कस्तुरीमृग
- चाकरमानी
- जास्वंदी
- नटसम्राट