Jump to content

"तुकाराम जाधव (गिर्यारोहक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तुकाराम जाधव हे एक मुंबईतील विलेपार्ल्याच्या दीनानाथ नाट्य मंद...
(काही फरक नाही)

२३:४२, १७ जून २०१५ ची आवृत्ती

तुकाराम जाधव हे एक मुंबईतील विलेपार्ल्याच्या दीनानाथ नाट्य मंदिरात नाटकांचे फलक रंगवणारे एक कलावंत आहेत. ते इ.स. १९७८पासून हे काम करीत आहेत. त्यांनी रंगवलेले देखणे फलक रसिकांच्या आजही नजरेसमोर आहेत.

तुकाराम जाधव यांचे आणखी एक वैशिष्ट्य की आयुष्यभर दुर्गभ्रमंतीचा ध्यास घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य गड-किल्ले पालथे घातले आहेत. ३०० वर्षे मानवाचा स्पर्श झालेला लिंगाणा ते चढून गेले आहेत. दुर्गम भवानी कड्यावरचे आरोहण आणि पौर्णिमेच्या रात्री रायगडच्या हिरकणी कड्यावर केलेले आरोहण त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. यांव्यतिरिक्त आणखी ३५ कड्यांवर प्रस्तरारोहण करणे त्यांनी अंमलात आणले आहे.

गिर्यारोहण आणि दुर्गभ्रमण केवळ छंद म्हणून नव्हे तर ध्यास म्हणून बाळगणार्‍या या तुकाराम जाधव यांना २०१५ सालचा प्रतिष्ठेचा 'श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' दिला गेला आहे.

तुकाराम जाधव यांनी दुर्गभ्रमणाच्या अनुभवांवर लिहिलेली व काही अन्य पुस्तके

  • गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे
  • शिवरायांचा आठवावा प्रताप
  • श्रीमंत योगी
  • स्वामी विवेकानंद (अप्रकाशित)

तुकाराम जाधव यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'भवानीवीर' म्हणून केलेला सन्मान.
  • शि‍वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून 'हिरकणी वीर' हा सन्मान.
  • सतत चौदावेळा किल्ले रायगडाची प्रदक्षिणा केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नी. दांडेकर यांनी त्यांना 'रायगडभूषण' हा विशेष किताब दिला.
  • पार्ल्याच्या नागरिकांंनी 'पार्लेभूषण' म्हणून केलेला गौरव.
  • पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' यांनी दिलेला 'श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार'. (२०१५)